नागपूर: केंद्रातील मोदी सरकारला ११ वर्ष पूर्ण झाली, त्याचे वर्णन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी “बोलाचीच कढी अन् , बोलाचाच भात” असे केले आहे. असं भाजप आणि मोदी सरकारच काम आहे, अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली.
आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संघटनांच्यावतीने लेखाजोखा मांडला पाहिजे. हॅपी इंडेस्क, बेरोजगार, गरीब गरीब का झाला? , २०१४ मध्ये २ कोटी नोकरी देऊ, शेतकरी उत्पन्न दुप्पट, स्वामीनाथन आयोग, स्मार्ट सिटी, या पलीकडे जाऊन प्रत्येक माणसाच्या खिशात १५ लाख देणार, अण्णा हजारे, बाबा रामदेव यांनी पेट्रोलचे दर कमी करणार, लोकपाल याच काय झालं याच उत्तर मोदींनी दिलं पाहिजे, असे सपकाळ म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाने काय निर्णय काय घ्यावा हा त्यांचा विषय आहे. भाजप विरोध, संविधान बदल सुरू आहे, जे सोबत असतील आम्ही त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ, असे ते म्हणाले.
ठाकरे बंधू भेट
त्यांच्या भेटीबद्दल तेच चांगल्या पद्धतीने सांगतील. महाराष्ट्रात अनेक समस्या, शेतकरी मुद्दे आहेत. पीक कर्ज ,पीक कर्ज गठन आहे. या संदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही. तर बी बियाणे याचा तुटवडा निर्माण झाला आहे, शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपये दिले गेले पाहिजे, लक्ष विचलित करण्यासाठी हे सगळं सुरू आहे, बीड प्रकरण असो पुण्याचा प्रकरण असो की आता या दोन भावांची युती असो असे सपकाळ म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्था
आम्ही निर्णय घेतलेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर आमचे नेते आणि संघटितपणे निर्णय घेतील, ते आम्ही कळवले सुद्धा आहे.
किरण कुलकर्णीची नार्को टेस्ट करा
मतांवर डल्ला मारला, त्याचे सूत्रधार हे कुलकर्णी आहेत, संध्याकाळी सहा नंतर ७४ लाख मतदान कसं वाढलं. हे ओपन सिक्रेट आहे, त्यामुळे कार्यरत किरण कुलकर्णी असल्यामुळे त्यांची नार्कोटेस्ट व्हावी मतांवर दरोडा टाकलेला आहे, हे मॅच फिक्सिंग आहे ही मतांची चोरी आहे ती पुढे स्पष्ट होईल. निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार अगोदर सुद्धा केलेली आहे, निवडणूक आयोग अमित शहा यांच्या सूचनेनुसार काम करत असल्याचा स्पष्ट होत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होण्याच्या पूर्वी काँग्रेसचे शिष्ट मंडळ पुराव्यांशी निवडणूक आयोगात गेले होते. पाच वाजल्यानंतर मतदान ८.७४ टक्के कसं वाढलं, त्यावेळी आम्ही तक्रार केली. संसदेत राहुल गांधी यांनी सुद्धा राजकारण बाजूला ठेवून लोकशाही वाचवण्यासाठी चौकशीच्या आदेश द्या अशी मागणी केली.
निवडणूक आयोगाने आम्ही मागणी केल्यास नियम बदलले. त्यामुळे निवडणूक आयोगाची भूमिका संशयास्पद आहे. माध्यमांना यावर संताप का येत नाही. निवडणूक आयोगाला चौथ्या स्तंभावर आक्षेप आहे हे निषेधार्थ आहे…