नागपूर: जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या राऊळगाव येथील बारुद कंपनीत मोठा स्फोट झाला. मोठ्या प्रमाणात आग लागली असून मृतांचा आकडा १५वर पोहोचला असल्याची माहिती आहे. तीव्रता इतकी होती की या स्फोटाचे हादरे परिसरात अनेक किलोमीटर अंतरावर बसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. मृतांमध्ये महिला असल्याची माहिती आहे. मागील वर्षी याच कंपनीत १६ फेब्रुवारीला रविवारीच स्फोट झाला होता.

काटोल एसबीएल नामक बारूद कंपनीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात अनेक कामगारांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमी कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. आज १ मार्च (रविवार) या बरुद कंपनीत स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासह पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटाचे हादरे परिसरात अनेक किलोमीटर अंतरावर बसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.

उन्हाळ्याचे दिवस असल्याने परिसरातील जंगलातसुद्धा या स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग पसरल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळी आजुबाजूच्या गावातून लोकांनी गर्दी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते सलील देशमुख देखील काही वेळातच घटनास्थळासाठी पोहोचले. या कंपनीत फटाक्यात लागणारी बारूद या ठिकाणी तयार होत असल्याची माहिती आहे.

जवळच्या जंगलात लागली आग

हा स्फोट इतका शक्तिशाली होता की सुमारे २० किलोमीटर अंतरापर्यंत स्फोटाचे हादरे बसले आहेत. या स्फोटामुळे जवळच्या जंगलातसुद्धा आग लागल्याची ही माहिती समोर आलीय. या घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घटनास्थळी पोलीस अधीक्षक यांच्यासह काटोल, कळमेश्वर पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाकडून घेतली स्फोटाची माहिती. तात्काळ मदत करण्याचे निर्देश. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हाधिकारी यांना घटनास्थळी पोहोचत आहेत.