नागपूर : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत  ३१ करोनाग्रस्त आढळले. परंतु केवळ ७२६ चाचण्यांमध्ये इतके रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.

शहरात दिवसभरात ६८५, ग्रामीणला ४१ अशा एकूण ७२६ चाचण्या झाल्या. त्यात शहरात ३१ नवीन करोनाग्रस्त आढळले.  ग्रामीणला एकही नवीन रुग्ण नाही. त्यामुळे शहरात चाचण्यांच्या तुलनेत नवीन रुग्ण बघता सकारात्मक अहवालाचे प्रमाण तब्बल ४.६२ टक्के आहे.  जिल्ह्यात हे प्रमाण ४.२६ टक्के नोंदवले गेले. त्यामुळे विषाणूचे संक्रमण वाढताना दिसत आहे.  नवीन रुग्णांमुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या ४ लाख ६३१, ग्रामीण १ लाख ६८ हजार ७०९, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ९९६ अशी एकूण ५ लाख ७९ हजार ३३६ रुग्णांवर पोहचली आहे.  दिवसभरात शहरात ३०, ग्रामीणला ५ असे एकूण ३५ व्यक्ती करोनामुक्त झाले.