नागपूर : ‘प्यार किया तो डरना क्या’ असे म्हणत कुटुंबीयांचा विरोध झुगारून प्रियकर-प्रेयसी पळून जाऊन लग्न करतात. मात्र, प्रियकर-प्रेयसीचे पती-पत्नीच्या नात्यात रुपांतर झाल्यानंतर काही दिवसांतच खटके उडायला लागतात. कौटुंबिक वादातून संसार विस्कळीत होण्याच्या काठावर येतो. गेल्या आठ वर्षांत ४ हजार ९४७ प्रेमविवाह करणाऱ्यांच्या संसारात विघ्न आले आहे. त्या दाम्पत्यांनी भरोसा सेलमध्ये धाव घेतली. लग्नाच्या काही महिन्यांतच एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेणे आणि ‘इगो’ दुखावणे हे प्रमुख दोन कारण प्रेमविवाहात आड येत असल्याचे निदर्शनात आले आहे.

गेल्या काही वर्षांत प्रेमविवाह करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये सर्वाधिक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा समावेश आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ओळख झाली. प्रेमसंबंध प्रस्थापित झाले आणि प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतल्याची अनेक प्रकरणे आहेत. तसेच सोबत नोकरी करीत असताना ओळख झालेले किंवा एकाच वस्तीत राहणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसींनी प्रेमविवाह केल्याच्याही घटनांचा समावेश आहे. काही महिने किंवा वर्षभर प्रेमप्रकरण झाल्यानंतर लगेच प्रेमविवाह करण्याचा निर्णय तरुण-तरुणी घेतात. अनेकदा दोघांपैकी एकाच्याही हाताला काम नसते, बेरोजगार असतानाही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. लग्नापूर्वी चित्रपटातील कथानकाप्रमाणे मोठमोठी स्वप्ने रंगवतात. मात्र, लग्न झाल्यानंतर प्रियकर-प्रेयसी या नात्याला फाटा मिळून पत्नी-पत्नी हे नवे नाते निर्माण होते. नव्याने संसार थाटल्यानंतर पती हाताला काम शोधतो. दिवसभर राबतो आणि सायंकाळी घरी येतो. मात्र, लग्नाच्या काही महिन्यांतच ‘तू पहिल्यासारखा नाही राहिलास…मला वेळ देत नाही’ अशी कुरकुर प्रेयसीची पत्नी झालेल्या तरुणीची असते. तसेच दोघेही एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत अविश्वास दर्शवतात. अशा तक्रारीतूनच प्रेमविवाह तुटण्याच्या काठावर असतात. एकमेकांपासून घटस्फोट घेईपर्यंत प्रकरण पोहचते. अशाच प्रकारचे तब्बल ४ हजार ९४७ प्रेमविवाह करणारे तरुण-तरुणींनी गेल्या आठ वर्षांत भरोसा सेलमध्ये तक्रारी नोंदविल्या आहेत.

honour killing interfaith marriages
आंतरधर्मीय लग्न करणाऱ्यांसाठी ‘सेफ हाऊस’, ‘ऑनर किलिंग’ थांबवण्याकरिता राज्य सरकारचा पुढाकार
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
woman cheated news loksatta
लग्नाचे आमिष दाखवून पावणे आठ लाखांना लुटले, कर्जत पोलीस ठाण्यात नाशिकच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल
UP Murder Case
Alimony : पत्नीला पाच लाखांची पोटगी देणं टाळण्यासाठी तरुणाचं भयंकर कृत्य, पत्नीला चंडी देवीच्या दर्शनाला नेलं अन् काढला काटा
Lock in period of marriage court verdict chatura article
विवाहाचा लॉक-इन पिरीयड
Living apart together trend
‘Living apart together’ म्हणजे काय? जोडप्यांमध्ये हा ट्रेंड का वाढतोय?
5995 couples got divorced in seven years from 2018 to 2024 in nagpur
नागपुरात रोज होतात दोन घटस्फोट! काय आहे कारण…
Crime News
Crime News : पत्नीच्या विश्वासघाताने पती शॉक! आधी १० लाखांना किडनी विकायला तयार केलं, पैसे मिळताच पेंटरबरोबर झाली फरार

हेही वाचा – ‘नाईट पार्टीं’मुळे ग्रामस्थांसह वन्यजीवांना त्रास; ताडोबालगतच्या रिसॉर्ट्स, हॉटेल्समध्ये रात्रभर चालतो ‘धांगडधिंगा’

हेही वाचा – “महायुतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार..”, अभिजीत अडसूळ यांची राणा दाम्पत्यावर टीका

प्रेमविवाहानंतर आलेल्या तक्रारी

२०१७ – ५२४
२०१८ -५५३
२०१९ – ३८६
२०२० – ४५८
२०२१ – ६४१
२०२२ – ७८९
२०२३ – ७८५
२०२४ – ८८१

प्रेमविवाह केल्यानंतर काही महिन्यांतच संसारात विस्कटल्याच्या तक्रारी घेऊन पती-पत्नी येत असतात. वैवाहिक जिवनात अहम आणि लग्नापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्यामुळे खटके उडतात. दोघांचेही समूपदेशन करण्यात येते. त्यांचा विस्कळीत झालेला संसार पुन्हा रुळावर आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. – सीमा सुर्वे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भरोसा सेल)

Story img Loader