पंतप्रधान नरेंद्र मोदी ११ डिसेंबरला नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या हस्ते समृद्धी महामार्ग, नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस आणि मेट्रोच्या दोन मार्गिकांचे उद्घाटन होणार आहे. मात्र, मोदी यांच्या नागपूर दौऱ्यापूर्वीच केंद्र सरकारकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले नागपूर मेट्रो टप्पा-२ आणि नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीमुळे केंद्र सरकारकडून नागपूरला मोठी भेट मिळाली आहे.

हेही वाचा- बुलढाणा: राज्यपालांसह, भाजप नेत्यांविरोधात सर्वधर्मीय शिवप्रेमी आक्रमक; देऊळगावराजा शहर कडकडीत बंद

On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Kia vehicles will be expensive from April 1
‘किआ’ची वाहने १ एप्रिलपासून महागणार

केंद्र सरकारने नागपूरच्या विकासाला चालना देणारे मेट्रो टप्पा-२ व नागनदी पुनरुज्जीवन या एकूण ८ हजार ८०८ कोटी रुपयांच्या दोन प्रकल्पांना केंद्र सरकारने गुरुवारी मंजुरी दिली. मेट्रो टप्पा-दोन ४३.८ किलोमीटरचा असून ६,७०८ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. या टप्प्यात नागपूरलगत बुटीबोरी, कन्हान आणि हिंगण्यापर्यंत मेट्रो धावणार आहे.

हेही वाचा- कसा आहे समृध्दी महामार्गाचा आरंभ बिंदू?; एक किलोमीटर क्षेत्र, रांगोळीचा आकार आणि बरेच काही

नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्प २१०० कोटींचा प्रकल्प असून याद्वारे नागनदी शुद्धीकरण करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शहरातील जवळपास ५०० किमी मलवाहिनीचे नूतनीकरण करण्यात येईल. यात केंद्र, राज्य व महापालिकेचा ६०:२५:१५ या प्रमाणात वाटा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून १ लाख ३१ हजार ८६१ घरांच्या मलवाहिनी जोडण्यात येतील. प्रकल्पाची अंमलबजावणी नागपूर महापालिकेकडून केली जाणार आहे. यासाठी नदीत येणारे सांडपाणी अडवणे किंवा ते वळवणे, प्रक्रिया करणे, सांडपाणी प्रक्रिया केंद्र तयार करणे, प्रसाधनगृह आदी कामे प्रकल्पांतर्गत होणार आहेत.

हेही वाचा- बापरे! चिडलेल्या हत्तीने फुटबॉलसारखी उडवली समोरची दुचाकी, तरुणाचा जीव थोडक्यात वाचला, पाहा VIDEO

दरम्यान, पहिल्या टप्प्यातील कामठी मार्गावरील आटोमोटिव्ह चौकापर्यंत तर सेंट्रल ॲव्हेन्यूवर प्रजापतीनगरपर्यंत मेट्रो मार्गिका पूर्ण झाली असून त्याचे पंतप्रधानांच्या हस्ते ११ डिसेंबरला उद्घाटन आहे. त्यानंतर या मार्गावरून प्रवासी सेवा सुरू होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.