नागपूर : पीडिता सकाळी आंघोळीसाठी न्हाणीमध्ये गेली. याठिकाणी तिला भ्रमणध्वनी ठेवलेला दिसला. पीडितेने या भ्रमणध्वनीची तपासणी केल्यानंतर तिला धक्का बसला. या भ्रमणध्वनीचा कॅमेऱ्यातून चित्रिकरण सुरू असल्याचे तिच्या निदर्शनास आले. यावेळी आरोपी हा दारातून सर्व प्रकार पाहत होता. पीडितेने आरडाओरड केल्याने तिची मोठी बहीण धावत आली. त्यानंतर, आरोपीने भ्रमणध्वनी देण्याबाबत दोघींनाही धमकावले. पीडितेच्या तक्रारीवरून उमरेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा : नागपूर : महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला दोन हजारांची लाच घेताना अटक

Gudi Padwa Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला बाजारात उत्साह, ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…
Best Selling Bike
‘या’ बाईकने TVS Raider, Pulsar, Apache सह सर्वांचा केला खेळ खल्लास? २९ दिवसात २ लाख ७७ हजाराहून अधिक लोकांनी केली खरेदी

हेही वाचा : यवतमाळ : शेतकरी कन्येने शिकवणी वर्गाशिवाय ‘नीट’ परीक्षेत मिळवले ६१० गुण

 अल्पवयीन मुलीची आंघोळ करतानाची चित्रफीत बनवणाऱ्या आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा ठोठावली. महेश मोरेश्वर डंभारे (२५, रा. मंगळवारी पेठ, उमरेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने सर्व पुरावे व साक्ष लक्षात घेत आरोपीस दोषी ठरवले. सरकारतर्फे ॲड. श्याम खुळे यांनी बाजू मांडली.