नागपूर : मध्य रेल्वे प्रशासनाने परिचालन कारणास्तव नागपूर–मुंबई मार्गावरील महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळापत्रकात तसेच फलाट क्रमांकामध्ये बदल केला आहे. यामध्ये नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती एक्सप्रेस या गाड्यांचा समावेश आहे.
सुधारित वेळापत्रक एप्रिल २०२६ पासून टप्प्याटप्प्याने लागू करण्यात येणार असून संबंधित स्थानकांवरील फलाट क्रमांकातही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी अद्ययावत वेळापत्रकाची खात्री करून घ्यावी तसेच स्थानकावरील सूचनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
दुरांतो व अमरावती एक्सप्रेसच्या वेळेत बदल ट्रेन क्र. १२१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती एक्सप्रेस (दि. १४ एप्रिल २०२६ पासून) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : प्रस्थान रात्री २०.५० वा. (पूर्वी २०.०५ वा.) दादर : आगमन २१.०२ वा., प्रस्थान २१.०५ वा. ठाणे : आगमन २१.१७ वा., प्रस्थान २१.२० वा. कल्याण : आगमन २१.४७ वा., प्रस्थान २१.५० वा. इगतपुरी : आगमन २३.३० वा., प्रस्थान २३.३५ वा.
ट्रेन क्र. १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर दुरांतो एक्सप्रेस (दि. १४ एप्रिल २०२६ पासून)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : प्रस्थान २०.३५ वा. (पूर्वी १९.५५ वा.)
शट्रेन क्र. १२२९० नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दुरांतो एक्सप्रेस (दि. १४ एप्रिल २०२६ पासून)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : आगमन सकाळी ०७.५० वा. (पूर्वी ०८.०५ वा.)
इतर गाड्यांच्या वेळेतही सुधारणा
दादर – हुबळी एक्सप्रेस
दादर : प्रस्थान २०.०५ वा. (पूर्वी २०.१५ वा.) ठाणे : आगमन २०.२२ वा., प्रस्थान २०.२५ वा. पनवेल : आगमन २१.०८ वा., प्रस्थान २१.१० वा.
ट्रेन क्र. ११३०१ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बेंगळुरू एक्सप्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : प्रस्थान ०७.५५ वा. (पूर्वी ०८.१० वा.)
दादर : आगमन ०८.०७ वा., प्रस्थान ०८.१० वा.
कल्याण : आगमन ०८.४२ वा., प्रस्थान ०८.४५ वा.
ट्रेन क्र. २२१०८ लातूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : आगमन ०८.०० वा. (पूर्वी ०७.५५ वा.)
ट्रेन क्र. १२११६ सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : आगमन ०६.३० वा. (पूर्वी ०६.३५ वा.)
ट्रेन क्र. २२१४४ बिदर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : आगमन ०८.०० वा. (पूर्वी ०७.५५ वा.)
महानगरी एक्सप्रेसचे टर्मिनल बदल
ट्रेन क्र. २२१७७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बनारस महानगरी एक्सप्रेस
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : प्रस्थान ००.१५ वा. (पूर्वी ००.१० वा.)
बनारस : आगमन ०३.४५ वा. (पूर्वी वाराणसी ०३.३५ वा.)
ट्रेन क्र. २२१७८ बनारस – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महानगरी एक्सप्रेस
बनारस : प्रस्थान ०९.४५ वा. (पूर्वी वाराणसी १०.०० वा.)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस : आगमन ११.४० वा.
रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे. फलाट क्रमांकांमध्येही बदल होण्याची शक्यता असल्याने स्थानकावरील घोषणांकडे लक्ष देण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

