nagpur municipal corporation notice to ncp office inaugurated by sharad pawar in nagpur zws 70 | Loksatta

नागपूर: शरद पवारांनी उद्घाटन केलेल्या कार्यालयापासून नागपूर राष्ट्रवादीने हात झटकले

विभागीय कार्यालयाच्या उद्‍घाटनाला स्वतः शरद पवार यांच्यासह विदर्भाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता
शरद पवार

बजाजनगर काचिपुरा येथील भूखंडधारकांना महापालिकेने नोटीस बजावताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच धास्तावले आहेत.ज्या भूखंडधारकांना नोटीस बजावली त्यात पक्षाचे नेते प्रशांत पवार यांचा समावेश आहे. व तेथे त्यांचे कार्यालय आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी तडकाफडकी पत्र काढून संबंधित कार्यालयाशी पक्षाचा संबंध नाही, असे स्पष्ट केले.

हेही वाचा >>> ‘कुणाच्या घरातील भांडणाशी देणे-घेणे नाही’; नाना पटोले म्हणाले, ‘जिसका नाम होता है, उसी को…’

विभागीय कार्यालयाच्या उद्‍घाटनाला स्वतः शरद पवार यांच्यासह विदर्भाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. प्रशांत पवार यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय कार्यालय असा मोठा फलकही लावण्यात आहे.

कार्यालयासमोर लावलेल्या फलकावर नेत्यांचे फोटोसुद्धा आहेत. शरद पवार यांनी स्वाक्षरी केलेला एक फोटोही कार्यालयात आहे. यापूर्वी महापालिकेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख मंगेश काशीकर यांनाही नोटीस पाठवली होती.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:27 IST
Next Story
‘कुणाच्या घरातील भांडणाशी देणे-घेणे नाही’; नाना पटोले म्हणाले, ‘जिसका नाम होता है, उसी को…’