नागपूर : महापालिकेने पाण्याचे देयक थकबाकी ठेवणाऱ्याबरोबरच मालमत्ता कर थकवणाऱ्यांना देखील दिलासा देण्याचा आणि मालमत्ता कर वसुली वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. मामलत्ता कर थकबाकीदारांना आकारण्यात आलेल्या दंडाची रक्कम ८० टक्के माफ करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालमत्ता कर थकबाकीदाराकडून थकीत मालमत्ता कर रक्कमेवर लागणारे दंड ८० टक्के माफ करण्याची महत्वाकांक्षी “मालमत्ता कर अभय योजना २०२४-२५” नागपूर महापालिकेन सुरू केली आहे. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ या कालावधीमध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्यांना थकीत मालमत्ताकरावर २ टक्के प्रति माह प्रमाणे दंड आकारण्यात येते. सध्या स्थिती दोन लाख ८६ हजार ३९९ मालमत्ता कर थकबाकीदार आहेत. एकूण थकबाकी ८५० कोटी १० लाख ७३ हजारांवर गेली आहे. यात ७७० कोटी ४५ हजार २८ हजार रुपये दंड आहे.

हे ही वाचा… १० महिन्यात २०२ विशेष रेल्वेगाड्या रद्द, १ हजार १४६ विशेष गाड्यांना बिलंब

थकबाकीवर २० टक्के दंड

ही योजना ३१ मार्च २०२४ पर्यंत असून थकबाकीच्या रकमेवर केवळ २० टक्के दंड आकारण्यात येणार आहे. चालू आर्थिक वर्ष २०२४-२०२५ चा मालमत्ता कर नागपूर महापालिका निधीत जमा करणे आवश्यक आहे. या योजनेतून महापालिकेला मूळ थकीत रक्कम आणि २० टक्के दंडांची रक्कम यासह सुमारे २०० कोटीची वसुली होणे अपेक्षित आहे.

हे ही वाचा… लोकजागर : कापूस, तूर आणि सोयाबीन…!

शासकीय, निमशासकीय मालमत्तेवर ३०.७३ कोटी थकीत

शासकीय आणि निमशासकीय मालमत्तेवरील ३०.७३ कोटी रुपयांचे मालमत्ता कर थकीत आहे. काही वादग्रस्त प्रकरणामुळे सुद्धा रक्कम २२७ कोटी थकीत आहे. दंडाची रक्कम माफ करण्याबाबत महापालिकेने निवेदन प्राप्त झाले होते. त्यानुसार थकीत रक्कमेची वसुली अधिक प्रमाणात करता येईल यादृष्टीने मालमत्ताधारकांच्या थकीत मालमत्ताकरावरील लागत असलेली दंडाच्या रक्कमेवर ८० टक्के माफ करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur municipal corporation plan for penalty waiver in tax collection rbt 74 asj