राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्षेत्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे रद्द करण्यात आलेल्या १६ आणि १७ ऑगस्टच्या परीक्षांच्या नवीन तारखा जाहीर झाल्या असून १६ ऑगस्टची परीक्षा २७ ला तर १७ ऑगस्टची परीक्षा २८ ऑगस्टला होणार आहे. परीक्षांची वेळ पूर्वीप्रमाणेच राहिल,असे परीक्षा विभागाने सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांपूर्वी नागपूर तसेच नजिकच्या जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे बस तसेच इतर वाहतूक सेवा विस्कळित झाली. विद्यापीठाच्या अखत्यारित नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा आदी जिल्हे येतात. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने १६ आणि १७ ऑगस्टला होणाऱ्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षा आता अनुक्रमे २७ आणि २८ ऑगस्टला घेतल्या जाणार आहेत.

२१ ऑगस्टची परीक्षा स्थगित –

विद्यापीठाच्या चारही जिल्ह्यातील विविध केंद्रांवर २१ ऑगस्टला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार आहे. त्यामुळे जिल्हाप्रशासनाच्या पत्रानुसार विद्यापीठाने २१ ऑगस्टच्या परीक्षा स्थगित केल्या असून त्या आता १ सप्टेंबरला होणार आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur new dates for exams canceled due to heavy rain announced msr
First published on: 18-08-2022 at 15:45 IST