राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने केलेल्या २० टक्के शुल्कवाढीला विधिसभा सदस्यांकडून झालेल्या विरोधानंतर आता विद्यार्थी संघटनांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि युवा ग्रॅज्युएट फोरमने शुल्कवाढीला कडाडून विरोध करत ती लगेच मागे घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे. शुल्कवाढ मागे न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना विद्यापीठाचा हा निर्णय आला आहे. शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी थेट २० टक्के तर २०२३-२४ शैक्षणिक सत्रासाठी शुल्कामध्ये आणखी ७ टक्के वाढ करण्यात येणार आहे. ज्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे, त्यांनी पुन्हा विद्यार्थ्यांकडून २० टक्के वाढीव शुल्क आकारावे, असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. आता अनुदानित महाविद्यालयांमध्ये विज्ञान आणि गृहविज्ञानाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १८ हजार ५४७ रुपये शिकवणी शुल्क तर १२ हजार ३६५ रुपये प्रयोगशाळा शुल्क भरावे लागतील.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur organizations are aggressive against the increase in university fees amy
First published on: 15-08-2022 at 10:13 IST