साडी बघताच मुलींच्या डोळय़ात पाणी; आईच्या मायेची उणीव भरून निघाल्याची भावना
अनिल कांबळे
श्रद्धानंदपेठेतील अनाथालयात लहानाच्या मोठय़ा झालेल्या पाच मुलींच्या सामूहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. लग्न मंडपात पाचही नववधू पोहचल्या. लग्न लागण्यास काही अवधी शिल्लक असतानाच भरोसा सेलमधील पाच महिला पोलीस कर्मचारी तिथे पोहचल्या. त्यांनी स्वत:कडून आणलेली ‘माहेरची साडी’ नववधूंना सोपवली. साडी बघताच नवरी मुलींच्या डोळय़ात टचकन पाणी आले. त्यांनी खाकी वर्दीतील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना मिठी मारत आईच्या मायेची उणीव भरून निघाल्याची भावना व्यक्त केली.

पोलीस म्हटले की जरब, धाक आणि वचक असे चित्र मांडले जाते. मात्र, पोलिसांच्या आतही एक माणुसकी जपणारे मन असते. त्याच प्रेमाचा प्रत्यय या विवाह सोहळय़ात आला. नागपुरातील श्रद्धानंदपेठ अनाथआश्रमात लहानाच्या मोठय़ा झालेल्या पाच तरुणींच्या लग्न सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. लग्नाचा दिवस उजाडला. अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभली. लग्नापूर्वी हळद आणि अन्य प्रथा आटोपल्या. लग्नमंडपात पाचही नवरदेव पोहचले. काही वेळातच नववधूसुद्धा आल्या. दरम्यान. नागपूर शहर पोलीस दलाच्या भरोसा सेलमध्ये कार्यरत ५ ते ६ महिला कर्मचारी लग्नमंडपात पोहचल्या. वरपित्याची जबाबदारी असलेल्या बी.सी. भरतिया, ज्ञानेश्वर रक्षक, प्रभाकर देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर नववधूच्या वेशात बसलेल्या पाचही तरुणींची महिला पोलिसांनी गळाभेट घेतली. महिला पोलिसांनी सर्व नववधूंना ‘माहेरची साडी’ आणि भेटवस्तू दिली. साडी बघताच नववधूंच्या डोळय़ात पाणी तरळले. माहेरून आलेल्या भेटीसारख्याच आनंदाने त्यांनी या भेटवस्तूचा स्वीकार केला.

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार
Accused in gang rape case
सामूहिक बलात्कार प्रकरणातील नऊ वर्ष पसार असलेल्या आरोपीला अटक
girl rescued within twelve hours
अपहरण झालेल्या पाच वर्षीय मुलीची बारा तासांत सुटका

माहेरच्या साडीवरच नववधूंची ‘पाठवणी’
सायंकाळी लग्नसोहळा संपल्यानंतर नववधूंना सासरी ‘पाठवणी’चा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी पाचही नववधूंनी महिला पोलिसांनी दिलेल्या साडय़ा परिधान केल्या. त्याच साडय़ांवर ‘पाठवणी’ झाल्याचे बघून महिला पोलिसांच्याही डोळय़ांच्या कडा पाणावल्या.प्रत्येक मुलीला आईकडून माहेरची साडी मिळते. मात्र, आमच्या माहेराची उणीव महिला पोलीस अधिकाऱ्यांनी भरून काढली. ही मायेची ऊब आमच्या कायम लक्षात राहील. आम्हाला हक्काचे माहेर मिळाले, अशी भावना नववधू सीमा आणि संतोषी यांनी व्यक्त केली.

नागपूर पोलीस विभागाचे भरोसा सेल हे प्रत्येक महिलेसाठी दुसरे माहेरघर आहे. भरोसा सेलमधील सर्व महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लग्नाचे निमंत्रण होते. त्यामुळे आमच्यावर असलेली माहेरची जबाबदारी आणि आमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी लग्नात उपस्थित होतो. – सीमा सूर्वे, पोलीस अधिकारी, भरोसा सेल.