नागपूर : गुजरातमधील इंस्टाग्रामवरील कापडाच्या जाहिरातीला प्रतिसाद देत कॅनडातील युवतीने खरेदी करीत पैसे भरले. परंतु, त्या आरोपीने पैसे घेतल्यानंतर तिची फसवणूक केली. त्यामुळे तिने कॅनडातून नागपूर पोलिसांना ट्विट करीत तक्रार मांडली. नागपूर सायबर पोलिसांनी लगेच प्रतिसाद देत आरोपीकडून तिला पैसे परत मिळवून दिले. त्या युवतीने ट्विट करून नागपूर पोलिसांचे आभार मानले.

कॅनडातील जीना वर्गीस या युवतीला इंस्टाग्रामवर भारतातील कपडय़ांची जाहिरात दिसली. त्यामुळे तिने बरीच खरेदी केली आणि दुकानदाराच्या खात्यात पैसेही पाठवले. पैसे मिळताच इंस्टाग्रामवरील दुकानदार महिलेने जीना यांना चक्क ब्लॉक केले. त्यामुळे जीनाने इंस्टाग्रामवर दिलेल्या जाहिरातीतील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला, परंतु तिला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने शेवटचा पर्याय म्हणून नागपूर पोलिसांना ट्विट करून मदत मागितली. पोलीस उपायुक्त चेतना तिडके आणि पोलीस अधिकारी केशव वाघ यांनी लगेच तक्रारीची दखल घेतली.

hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
Elders Recreate Butterfly Song Dance cute video goes Viral
आयुष्य हे मनसोक्त जगावं! ‘बटरफ्लाय’ गाण्यावर वृद्ध लोकांचा भन्नाट डान्स, डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO व्हायरल
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
pune police search 50 retail drug dealers after bust major drug racket
पुणे पोलिसांचा आता अमली पदार्थ विक्रीच्या साखळीकडे मोर्चा ; राज्यातील मेट्रो शहरात शोध मोहीम

नागपुरातील ज्या बँक खात्यात पैसे वळते झाले होते, त्याची माहिती काढली. संबंधित व्यक्तीने गुजरातमध्ये राहणाऱ्या विवाहित मुलीने फसवणूक केल्याची कबुली दिली. वडिलाने तिच्या मुलीशी संपर्क साधून लुबाडलेले पैसे परत करण्यास बाध्य केले. जीना वर्गीस हिच्या खात्यात पैसे येताच तिने नागपूर सायबर पोलिसांचे ट्विटरवरून आभार मानले.