नागपूर : गुजरातमधील इंस्टाग्रामवरील कापडाच्या जाहिरातीला प्रतिसाद देत कॅनडातील युवतीने खरेदी करीत पैसे भरले. परंतु, त्या आरोपीने पैसे घेतल्यानंतर तिची फसवणूक केली. त्यामुळे तिने कॅनडातून नागपूर पोलिसांना ट्विट करीत तक्रार मांडली. नागपूर सायबर पोलिसांनी लगेच प्रतिसाद देत आरोपीकडून तिला पैसे परत मिळवून दिले. त्या युवतीने ट्विट करून नागपूर पोलिसांचे आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कॅनडातील जीना वर्गीस या युवतीला इंस्टाग्रामवर भारतातील कपडय़ांची जाहिरात दिसली. त्यामुळे तिने बरीच खरेदी केली आणि दुकानदाराच्या खात्यात पैसेही पाठवले. पैसे मिळताच इंस्टाग्रामवरील दुकानदार महिलेने जीना यांना चक्क ब्लॉक केले. त्यामुळे जीनाने इंस्टाग्रामवर दिलेल्या जाहिरातीतील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला, परंतु तिला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. तिने शेवटचा पर्याय म्हणून नागपूर पोलिसांना ट्विट करून मदत मागितली. पोलीस उपायुक्त चेतना तिडके आणि पोलीस अधिकारी केशव वाघ यांनी लगेच तक्रारीची दखल घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur police help canadian girl zws
First published on: 19-01-2022 at 02:31 IST