नागपूरात तृतीयपंथीयांनी रस्त्यावर वाहचालकांना त्रस्त करून पैसे मागू नये तसेच कुणाच्या घरी लग्न, धार्मिक कार्यक्रम असल्यास त्यांच्याकडून खंडणी स्वरूपात पैसे उकळू नये, अन्यथा त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करण्याची आक्रमक भूमिका पोलिसांनी घेतली. त्यामुळे आज किन्नर विकास मंचच्या अध्यक्ष राणी ढवळे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यांना किन्नरांची भूमिका आणि जीवनपद्धती समजावून सांगितली. यावेळी पोलीस आयुक्तांनी तृतीयपंथीयांना काम मिळवून देण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. परंतु, लोकांना पैसे मागून त्रस्त केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या भूमिकेवर ते ठाम राहिले.

हेही वाचा- नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. चौधरींकडून राज्यपालांच्या आदेशाची अवहेलना!

apmc market, license issue, nashik district
नाशिक : बाजार समित्यांमध्ये उत्तर भारतातील व्यापाऱ्यांना परवाने देण्याचा विचार
port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Thane, Police Arrest Two thefts, Involved in 16 Robberies, Recover Rs 17 Lakh, Stolen Goods , theft in thane, robbery in thane, robbery in badlapur, robbery in badlapur,
दागिने लंपास करणाऱ्या दोन भामट्यांना अटक, ठाणे आणि मुंबईतील १६ गुन्हे उघडकीस
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक

नागपूर शहरातील अनेक चौकात बिदागीच्या नावावर तृतीयपंथी बळजबरीने पैसे वसूल करतात. अनेकदा वाहनचालकांना शिवीगाळ करतात, वादही घालतात. महिला सोबत असल्यास पैशासाठी तगादा लावतात. तसेच घरी असलेल्या धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस आणि लग्न समारंभ असल्यास १० ते २० हजार रुपयांची खंडणी मागत असल्याच्या तक्रारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे आयुक्तांनी तृतीयपंथीयांवर रस्त्यावर पैसे मागण्यावर प्रतिबंध घातला.

हेही वाचा- …तर आम्ही तुमचा ‘दाभोळकर’ करू, ‘अंनिस’चे श्याम मानव यांना धमकी

सोमवारी किन्नर विकास मंचच्या अध्यक्ष राणी ढवळे यांच्या नेतृत्वात तृतीयपंथीयांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेतली. आयुक्तांनी त्यांना नोकरी, काम मिळवून देण्यासाठी मदत करण्याचे आश्वास दिले. तसेच तृतीयपंथीयांना कुणी धार्मिक कार्यक्रमात निमंत्रित केल्यास जाण्यास हरकत नसल्याचे सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बिदागी मागतो आणि जीवन जगतो. अचानक बिदागी मागण्यास प्रतिबंध घातल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे आमच्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी राणी ढवळे यांनी केली.