scorecardresearch

नागपूर रेल्वेने १०४ कोटींचे भंगार विकलेचच; ‘झिरो स्क्रॅप मिशन’ला सुरुवात

रेल्वेने नागपूर विभागात विविध ठिकाणच्या भंगार विक्रीतून १०४ कोटी रुपये कमावले आहेत.

नागपूर : रेल्वेने नागपूर विभागात विविध ठिकाणच्या भंगार विक्रीतून १०४ कोटी रुपये कमावले आहेत. रेल्वेच्या धोरणानुसार, झिरो स्क्रॅप मिशनला सुरुवात नागपूर विभागाने केली आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने भंगार साहित्यापासून मुक्तीचा संकल्प केला आहे. त्यासाठी ‘झिरो स्क्रॅप मिशन’ सुरू करण्यात आले आहे. स्क्रॅप मटेरियलमध्ये स्क्रॅप रेल, पी-वे मटेरियल, कंडिशन्ड कोच, वॅगन आणि बॅटरी इत्यादींचा समावेश आहे. 

विभागाने २०२१-२२ या आर्थिक वर्षांसाठी भंगार विल्हेवाटीतून १०४ कोटी रुपयांचे उत्पन्न नोंदवले आहे. २१ मार्च २०२२ पर्यंत नागपूर विभागासाठी ८० कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र नागपूर विभागाने लक्ष्यापेक्षा अधिक विक्री केली. हा अलीकडच्या काळातील सर्वाधिक भंगार विक्रीचा विक्रम आहे. गेल्या वर्षी याच कालावधीतील उत्पन्नापेक्षा हे २४ कोटी रुपये अधिक आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीत उत्पन्न ८०.०१ कोटी होते.  भंगार विक्रीतून पैसा तर मिळतोच पण परिसर देखील स्वच्छ होते, असे रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nagpur railway sells scrap beginning zero scrap mission ysh

ताज्या बातम्या