नागपूर : उपराजधानीतील सदर परिसरात पेट्रोलपंप व्यावसायिकाच्या घरी झालेल्या ३ कोटींच्या घरफोडीचा अखेर १० दिवसांनी छडा लावण्यात गुन्हे शाखेला शनिवारी यश आले. हायटेक पोलिसांनी घाम फोडणाऱ्याा या दोन चोरांना गुन्हे शाखेने ठाणे येथून अटक केली. मात्र त्या बाबतीत अत्यंत गोपनीयता पाळण्याचे कारण काय यावरून संताप व्यक्त होत आहे. रजनीकांत चानोरे, प्रताप उरकुडे अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन चोरांची नावे आहेत. हे दोघेही भंडारा येथील रहिवासी आहेत.

राज नगरातील बलविंदर सिंघ  इंदरजीत सिंग नैय्यर यांच्या बंगल्यात गुल्या गुरुवारी घरफोडी झाली होती. नैय्यर कुटुंब मुलाच्या साक्षगंधासाठी  कामठीला गेले हाते. रात्री तीनच्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला होता. घरातील सीसीटीव्हीत तपासणी केली असता त्यांना दोन चोरांनी अवघ्या २२ मिनिटांत अडीच किला सोन्याचे दागिने, रोख ६५ लाख रुपये आणि दीड कोटींचेहिऱ्याचे दागिने लंपास केले होते. सदर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला.

प्रेयसीला द्यायचे होते पैसे

चोरीचा मुख्य सुत्रधार रजनीकांत चानोरे  यांची प्रेयसी हैदराबाद येथे शिक्षण घेत आहे. तिच्या खर्चासाठी आरोपीला मदत करायची होती. त्यासाठी रजनीकांतने हा चोरीचा डाव रचला.

गुन्हे शाखेची लपवाछपवी?

सदरमधील घरफोडी दोन जणांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र, या गुन्हे शाखा या गुन्ह्याबाबत लपवाछपवी करीत आहेत. त्यामुळे काहीतरी ‘अर्थपूर्ण’ हालचाली होत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. सदर ठाण्यातील कोठ़डीत असल्यानंतरही सदर पोलीस माहित देण्यास टाळाटाळ  करत होते हे विशेष.