scorecardresearch

नागपूर विमानतळावर सेल्फी पाईंन्ट

नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी सेल्फी पाईंट तयार करण्यात आला आहे.

नागपूर विमानतळावर सेल्फी पाईंन्ट
संग्रहित छायाचित्र

नागपूर : नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांसाठी सेल्फी पाईंट तयार करण्यात आला आहे. देश-विदेशातून नागपुरात येणाऱ्या प्रवाशांना विदर्भातील प्रमुख स्थळांची महिती व्हावी हा या सेल्फी पॉईंटचा उद्देश आहे.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

नागपूरला रोज हजारो प्रवासी विमानाने येत- जात असतात. अनेक जण सेल्फी काढतात. आता त्यांच्यासाठी वेगळा सेल्फी पॉइंट तयार करण्यात आला.  नागपूर शहराची ओळख असलेली  संत्री फळाची प्रतिकृती तयार करण्यात आली. त्यात  महात्मा गांधी यांची सेवाग्राम येथील बापू कुटी, नागपूरचे प्रसिद्ध गणेश टेकडी मंदिर, पेंच आणि ताडोबाचे वाघ आदी चित्र रेखाटण्यात आले. याशिवाय देशातील एकमेव शुन्य मैल स्तंभाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे.  विमानतळावरील हे सेल्फी पाईंट प्रवाशांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.