नागपूर : शहरात रस्त्यांवर फिरणारे मोकाट जनावर नागरिकांसाठी किती धोकादायक ठरू शकतात याची थरकाप उडवणारी दृश्य नागपुरात पाहायला मिळत आहेत… सकाळी झाडू मारताना एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर मोकाट वळूने हल्ला चढवला. वळूच्या या भयावह हल्ल्यात गंभीर जखमी ज्येष्ठ महिला गेल्या एक महिन्यापासून मृत्यूशी झुंज देत आहे..

यामुळे रस्त्यावर फिरणारे मोकाट जनावर नागरिकांसाठी किती धोकादायक ठरू शकतात हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे… संताप जनक म्हणजे मृत्यूशी झुंज देत असलेल्या या ज्येष्ठ नागरिक महिलेवर मोकाट वळूचा हल्ला होऊन एक महिना लोटत आलाय मात्र अजूनही प्रशासनाचा एकही व्यक्ती साधी चौकशी करायलाही पोहचला नाही… धक्कादायक म्हणजे अजूनही त्या परिसरात मोकाट वळू फिरत असल्याचे कुटुंबीय धास्तीत आहे.

नागपुरातील वंदना देवीकर (६४ ) या ज्येष्ठ महिलेला, २७ जानेवारीला घरासमोर झाडू करत होत्या. मोकाट वळुने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.. सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास गल्लीत फारशी वर्दळ नसताना वळूचा वंदना देवीकर यांच्यावरील हल्ला एवढा भयावह होता की त्यात वंदना देवीकर यांच्या देहाची चाळण झाली.

त्यांच्या शरीराची अनेक हाडं मोडली, छातीतल्या बरगड्या मोडल्या, मेंदूला गंभीर इजा झाली.. तीन आठवडे रुग्णालयातील आयसीयू मध्ये मृत्यूशी झुंज दिल्यानंतर, तसेच मेंदूची क्लिष्ट शस्त्रक्रिया झाल्यानंतरही वंदना देवीकर अजुनपर्यत शुद्धीवर आलेल्या नाहीत .. गेले एक महिना त्यांनी डोळे उघडलेला नाही, त्या एक शब्दही बोललेल्या नाही..

कुटुंबाने लाखो रुपये खर्च करूनही वळूने केलेल्या हल्ल्यातील आंतरिक जखमा ( मेंदूला झालेली इजा ) भरून निघालेल्या नसल्यामुळे वंदना देवीकर त्यांच्या घरातच अंथरुणाला खिळून बेशुद्ध अवस्थेत आहेत.. त्यांना कुठलीही हालचाल करता येत नाही, डोळा उघडता येत नाही.. कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा करून तसेच इतर आवश्यक वैद्यकीय यंत्रे घरीच लावून देवीकर कुटुंबीयांनी वंदना यांना कसं तरी ठेवले आहे..

२७ जानेवारी रोजी वंदना देवीकर यांच्यावर वळूचा असा हल्ला झाल्यानंतर एक महिना उलटला तरी अद्याप पर्यंत महापालिकेच्या एकाही अधिकाऱ्याने, प्रशासन वा नगरसेवकाने देवीकर कुटुंबीयांना भेटून वंदना देवीकर यांची स्थिती जाणून घेण्याचा साधा प्रयत्न ही केलेला नाही.. पोलिसांनी फक्त तपासाचा सोपस्कार पार पाडला आहे….दुसऱ्या बाजूला हल्ला करणारा वळू अजूनही त्याच भागात मोकाट फिरत असल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे