scorecardresearch

नागपूर : होळी-धुळवडीला ५ हजारजणांवर कारवाई

होळी आणि धुलिवंदनाला वाहतूक शाखेने दोन्ही दिवसांत पाच हजारजणांवर कारवाई केली.

nagpur traffic police Action
नागपूर : होळी-धुळवडीला ५ हजारजणांवर कारवाई (प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर : होळी आणि धुलिवंदनाच्या पार्श्वनभूमीवर पोलिसांनी विशेष बंदोबस्त लावला होता. त्यामुळे अनुचित घटना घडली नसली तरी वाहतूक शाखेने दोन्ही दिवसांत पाच हजारजणांवर कारवाई केली.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलिसांद्वारे कोंबिंग ऑपरेशन राबविण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक मुख्य चौकात पोलीस नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी चोवीस तास रस्त्यावर पोलीस दिसून आले. त्यामुळे गुन्हेगार किंवा अपप्रवृत्तीच्या व्यक्तींना डोके वर काढता आला नाही. दरम्यान वाहतूक शाखेच्या उपायुक्त चेतना तिडके यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या १२९ जणांवर कारवाई करून ८५ वाहने जप्त केलीत. दुचाकीवर ‘ट्रिपल सीट’ बसणाऱ्या ३०७ जणांवर कारवाई करण्यात आली. विरुद्ध दिशेने जाणारे, सीटबेल्ट, हेल्मेट न वापरणारे, चुकीच्या जागी पार्किंग करणारे आणि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघण करणाऱ्या ४ हजार ७६३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा – ‘खरे संत कोण? ज्ञानेश्वर की भागेश्वर…’ एप्रिलमध्ये श्याम मानव यांचे विदर्भात ‘वैचारिक वादळ’

हेही वाचा – बुलढाणा : चिखली राज्यमार्गावर आढळला युवकाचा मृतदेह

”होळी-धुळवडीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला होता. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे होळीला कोणतीही वाईट घटना घडली नाही”, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 19:11 IST
ताज्या बातम्या