नागपूर : डोंगरदऱ्यातील आदिवासी विद्यार्थींनींनी अनुभवला मेट्रो सफरची आनंद

आदिवासी दुर्गम भागातील हे विद्यार्थी पहिल्यांदाच नागपूरसारख्या महानगरात आले होते.

नागपूर : डोंगरदऱ्यातील आदिवासी विद्यार्थींनींनी अनुभवला मेट्रो सफरची आनंद

चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम भागात राहणाऱ्या साडेतीनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी नागपूर मेट्रो सहलीचाचा आनंद लुटला. ही मुले प्रथमच नागपूरसारख्या महानगरात आली होती. उंच इमारती, डबल डेकर पुल, शहरी धावपळ या सर्व बाबी पाहून अचंबित झाली होती. आदिवासी दिनानिमित्त आदिवासी ग्रामीण भागातील इयत्ता चौथी ते दहावीचे ३५० विद्यार्थी नागपूर दर्शनासाठी चंद्रपूर येथून नागपुरात आले होते.

खापरी मेट्रो स्थानकातून मुलांचा नागपूर दर्शनाचा प्रवास सुरू झाला. झिरो माईल मेट्रो स्टेशनवर उतरल्यानंतर मुलांनी फ्रीडम पार्कला भेट दिली आणि पुन्हा झिरो माईल ते खापरी मेट्रो स्टेशन असा प्रवास केला. मेट्रोच्या प्रवासादरम्यान मुलांमध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद होता. मुलांनी प्लॅटफॉर्मवर सेल्फी घेत मेट्रोचा प्रवास आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

विशेष म्हणजे आदिवासी मुलांनी तिरंगा ध्वज सोबत आणला होता. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमूर आणि नागपूर मेट्रोच्या जनसंपर्क विभागाच्या संयुक्त प्रयत्नाने आदिवासी विद्यार्थ्यांची ही आनंदी सफर घडून आली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
परदेशी शिष्यवृत्तीधारकांना एका अटीचा जाच
फोटो गॅलरी