नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दहा पदवीधर जागांसाठी ११ डिसेंबरला निवडणुका होणार आहेत. मात्र, याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा असल्याने शासनाकडून विद्यापीठाच्या निवडणूक केंद्रांची माहिती घेतली जात आहे. या निवडणुकीमुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा व्यवस्थेत अडथळा येण्याची शक्यता वाटल्यास अधिसभा निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… राज्यकर्ते कोणीही असो, ज्या दिवशी शेतकरी आत्महत्या थांबतील …; काय म्हणाले नाना पाटेकर

हेही वाचा… अमरावती : पोलीस भरतीचे स्वप्न अधुरे; सरावादरम्यान तरुणीचा अपघाती मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन करण्यासाठी ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहेत. यानिमित्त शहरात कडक बंदोबस्त असेल. काही मार्ग वळवण्यात येणार आहेत. यामुळे मतदारांना मतदान केंद्रात येताना अडचण येऊ शकते. अशा स्थितीत ही निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ११ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी विद्यापीठात अद्याप मतपत्रिका निश्चित झाल्या नसल्याची माहिती आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur university election will be postponed due to pm narendra modis nagpur tour asj
First published on: 03-12-2022 at 12:19 IST