नागपूर : दत्ताजी डिडोळकरांनी स्थापन केलेल्या शिक्षण मंचाची प्रतिमा अध्यक्षा डॉ. कल्पना पांडे यांनी धुळीस मिळवली आहे. भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. पांडे यांची मनमानी सुरू आहे. विद्यापीठाच्या कुठल्याही प्राधिकरणावर नसताना संशोधक विद्यार्थिनींच्या न्यायासाठी समोर आल्यामुळे कल्पना पांडे यांनी संशोधक मार्गदर्शकाचा दर्जा काढून घेत मानसिक छळ देत शैक्षणिक नुकसान केले. त्यामुळे अशा व्यक्तिवर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी व्हीएमव्ही महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सोनू जेसवानी यांनी पत्रकार परिषदेतून केली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पांडे यांच्या विरोधातील दोन संशोधन विद्यार्थिनींनी २०२२ मध्ये केलेल्या मानसिक आणि आर्थिक छळाच्या तक्रारीनंतर डॉ. जेसवानी आणि डॉ. कल्पना पांडे यांच्यात वाद सुरू झाला होता. कुलगुरू डॉ. चौधरींच्या निलंबनावर कल्पना पांडे यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार प्रवीण दटके, विष्णू चांगदे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर आता डॉ. जेसवानी यांनी पुढे येत डॉ. कल्पना पांडे यांनी त्याच्याकडून झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला आहे. डॉ. जेसवानी यांनी सांगितले की, त्या २० वर्षांपासून प्राध्यापक आणि १२ वर्षांपासून संशोधक मार्गदर्शक आहेत. मात्र, त्यांच्या दोन संशोधक विद्यार्थिनींना पीएच.डी.चा लघुशोधप्रबंध मंजूर करून घेण्यासाठी हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी मानसिक छळ करीत पैशांचीही मागणी केल्याचा आरोप केला होता.

Supriya Sule slams Ajit Pawar group on Pune Accident
Supriya Sule slams Ajit Pawar group: “त्यांच्या दोन्ही हाताला रक्त…”, सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटावर प्रहार; म्हणाल्या, “मी स्वतः त्यांच्याविरोधात…”
ankita walawalkar reveals marriage plans and talk about future husband
अंकिताचा ‘कोकण हार्टेड बॉय’ कोण आहे? कोकणात करणार…
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
ramdas kadam on sanjay shirsat
“उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचं खच्चीकरण केलं”, रामदास कदम यांचा गंभीर आरोप; म्हणाले, “त्यांच्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच… ”
arvind sawant replied to chandrasekhar bawankule
“उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे” म्हणणाऱ्या चंद्रशेखर बावनकुळेंना ठाकरे गटाचे प्रत्युत्तर; म्हणाले…
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
Tirupati Prasad Controversy
Prakash Raj: ‘तुझ्या दिल्लीतील मित्रांमुळे धार्मिक तणाव’, तिरुपती प्रसाद वादावर अभिनेते प्रकाश राज यांची पवन कल्याण यांच्यावर टीका

हेही वाचा : गडचिरोली : आता काय बोलावं! ज्यांच्यावर घोटाळ्याचा आरोप, त्यांनाच मागितला अहवाल, अर्चना पुट्टेवारच्या कार्यकाळातील प्रकरणे…

यानंतर मनोज पांडे यांच्याविरोधात चौकशी समितीही स्थापन करण्यात आली होती. मात्र, कल्पना पांडे यांनी राजकीय दबाव वापरून संपूर्ण प्रकरणाला वेगळा रंग दिला. तसेच विद्यापीठाची बदनामी केल्याचा आरोप करीत संशोधक विद्यार्थिनींना त्रास दिले. तसेच विविध समित्यांवरून पायउतार करत संशोधक मार्गदर्शकाचा दर्जाची काढून टाकल्याचा आरोप डॉ. जेसवानी यांनी केला. डॉ. पांडे या भ्रष्टाचारी असून त्यांनी अनेकांचा छळ केल्याने त्यांच्यार कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जेसवानी यांनी केली.

हेही वाचा : Amol Mitkari: अमोल मिटकरी म्हणतात, “संजय राऊत दुतोंडी साप! ते लवकरच…”

बाविस्कर समितीने दोषी ठरवल्यावर न्याय नाही

उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव बाविस्कर यांच्या समितीने संशोधक विद्यार्थिनींवर अन्याय झाला. तसेच डॉ. जेसवानी यांचा संशोधक मार्गदर्शकाचा दर्जा द्यावा असा निर्णय दिला. मात्र, त्यानंतरही न्याय मिळाला नाही असा आरोपही जेसवानी यांनी केला.

जेसवानी यांचे प्रमुख आरोप काय?

  • चौधरींच्या निलंबनानंतर कल्पना पांडे आता स्वत:च्या बचावासाठी विद्यापीठाची बदनामी करीत आहेत.
  • पांडे यांनी जेसवानी यांचा संशोधक मार्गदर्शकाचा दर्जा काढून घेतला.
  • विद्यार्थ्यांसमोर वर्गातून धक्का देऊन बोलावणे.
  • सागर खादीवाला यांच्या देशभक्तीवर पुस्तकावर आक्षेप घेतला.

चार वर्षांपूर्वीचे हे प्रकरण असून सोनू जेसवानी या जुने प्रकरण उखडून काढत विद्यापीठाची बदनामी करत आहेत. सप्टेंबर २०२२मध्ये संशोधक मुलींनी अंबाझरी पोलिसात तक्रार दिली आहे. त्यामध्ये विष्णू चांगदे यांच्या सांगण्यावरून आम्ही हे सगळं प्रकरण समोर काढल्याचा त्यांनी आरोप केला होता. त्यानंतरही जेसवानी माझ्यावर खोटा आरोप करीत आहेत. तसेच या प्रकरणात निवृत्त न्यायमूर्ती मीरा खडककर यांच्या समितीने मनोज पांडे यांच्या बाजूने निर्णय दिला होता. असे असतानाही मी न्यायाधीशांच्या समितीच्या निर्णयात ढवळाढवळ करते हा चुकीचा आरोप आहे. प्रेस कॉन्सिल ऑफ इंडियाने ही असाच निर्णय दिलेला आहे.

डॉ. कल्पना पांडे, अध्यक्ष, शिक्षण मंच.