नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी सहाय्य निधीतून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. याकरिता विद्यार्थ्यांकडून २ जानेवारी २०२५ पर्यंत अर्ज मागवण्यात आल्याची माहिती विद्यार्थी विकास विभाग प्रभारी संचालक डॉ. विजय खंडाळ यांनी दिली.

विद्यापीठ शैक्षणिक विभाग, संचलित व संलग्नित महाविद्यालयातील गरीब, गरजू विद्यार्थ्यांना विद्यार्थी सहायता निधीमधून शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, वसतिगृह भाडे व जेवणाचा खर्च आदींसाठी आर्थिक मदत केली जाते. वरील निधीतून आर्थिक सहायता घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे विहित आवेदन पत्र आवश्यक कागदपत्रांसह विद्यार्थी विकास विभाग संचालक यांच्याकडे २ जानेवारी २०२५ पर्यंत प्राचार्य, विभाग प्रमुख, संचालक यांच्यामार्फत सादर करायचे आहेत. अर्जासोबत आई, वडिलांचे, पालकांचे सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले २०२४-२०२५ वर्षातील उत्पन्नाचे मूळ प्रमाणपत्राची प्राचार्य, विभाग प्रमुखाद्वारे साक्षांकित केलेली प्रत, मागील उत्तीर्ण झालेल्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची प्राचार्य विभागप्रमुखांद्वारे साक्षांकित केलेली प्रत, आवश्यक प्रमाणपत्रे व पावत्यांच्या प्राचार्य विभाग प्रमुखांद्वारे साक्षांकित केलेल्या झेरॉक्स प्रती तसेच संलग्नित पत्र प्राचार्यांनी आवेदन पत्रासोबत भरून पाठवायचे आहेत. भरावयाचा अर्ज नमुना व माहिती विद्यापीठाच्या http://www.nagpuruniversity.ac.in (Student corner/student development) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Aaple Sarkar, devendra fadnavis, mumbai,
‘आपले सरकार’द्वारे सेवांमध्ये वाढ करा : मुख्यमंत्री
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Nashik Municipal Schools Face Teacher Shortage,
शिक्षणमंत्र्यांच्या नाशिकमध्ये शिक्षकांची वानवा; मनपा प्राथमिक शिक्षकांची माध्यमिकमध्ये नियुक्तीची वेळ
yavatmal Adv Pranav Vivek Deshmukh graduated from London School of Economics
यवतमाळचा विद्यार्थी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
yavatmal student success in london school of economics
यवतमाळचा विद्यार्थी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत
RTE, RTE Admission, RTE Admission Registration,
‘आरटीई’ प्रवेश नोंदणी १३ जानेवारीपासून, जाणून घ्या सविस्तर…
Kavikulaguru Kalidas Sanskrit University ,
‘या’ विद्यापीठात मिळणार कर्मकांडाचे प्रशिक्षण! उद्देश वाचून थक्क व्हाल…
Financial assistance, inter-caste marriages, eligible
आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आर्थिक मदत, कोण ठरेल पात्र?

हेही वाचा – वाहन एकाचे, वाहतूक चालान दुसऱ्याला; नागपूर पोलिसांच्या प्रतापाने….

हेही वाचा – फडणवीसांच्या शपथविधीला गेलो नाही कारण…; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले

प्री. पीएच.डी कोर्सवर्क वेळापत्रक घोषित

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्री- पीएचडी कोर्सवर्क वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. दक्षिण अंबाझरी मार्गावरील सुभाष नगर येथील विद्यापीठाच्या यूजीसी-एचआरडीसी येथे संशोधक विद्यार्थ्यांना ९ ते २१ डिसेंबर दरम्यान कोर्सवर्क पूर्ण करता येणार आहे. नागपूर विद्यापीठाचे २८ जून २०२३ रोजीचे सुधारित मार्गदर्शक तत्वे आणि युजीसी-एमएमटीसीसीच्या २०२३ च्या ३४ दिशानिर्देशानुसार प्री-पीएचडी कोर्सवर्क वेळापत्रक घोषित करण्यात आले आहे. संशोधक विद्यार्थ्यांना ९ डिसेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान कोर्सवर्क पूर्ण करता येईल. कोर्स वर्क पूर्ण करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांची २१ डिसेंबर २०२४ रोजी परीक्षा घेतली जाणार आहे. कोर्सवर्क करिता विद्यापीठाच्या (www.nagpuruniversity.ac.in) या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. संपूर्ण भरलेला अर्ज, पीएचडी नोंदणी प्रमाणपत्र, शुल्काचा भरणा केलेली पावती यासह आवश्यक कागदपत्र विद्यापीठाच्या यूजीसी-एचआरडीसी येथे सादर करावे लागणार आहे. या कोर्सवर्क करिता ५० प्रवेश क्षमता आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी प्री-पीएचडी कोर्स वर्क कार्यक्रमाला मान्यता दिली असून संशोधक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रभारी प्र- कुलगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक डॉ. संजय कवीश्वर, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांच्यासह अन्य सदस्यांनी केले आहे.

Story img Loader