नागपूर : महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेनेने नागपूरमध्ये काँग्रेस समर्थित उमेदवाराला पाठिंबा दिला असला तरी अलीकडेच या पक्षाने वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली आणि येथे वंचितचाही उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे शिवसेना नेमकी कोणासोबत असा पेच निर्माण झाला आहे.

नागपूरची जागा महाविकास आघाडीत प्रथम शिवसेनेला सुटली त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादीने सेनेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. काहीच दिवसात सेनेने नागपूरची जागा सोडून नाशिकची जागा लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नागपूरची जागा काँग्रेसला मिळाली. काँग्रेसने येथे माध्यमिक शिक्षक संघाचे सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला. त्यासोबतच अडबालेंच्या समर्थनार्थ शिवसेनेने त्यांचा अधिकृत उमेदवार मागे घेतला. राष्ट्रवादीनेही त्यांना पाठिंबा दिला.

rohit pawar and udayanraje bhosale
साताऱ्यात घड्याळ विरुद्ध तुतारी लढत होणार? रोहित पवारांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “उदयनराजे…”
narendra modi and sharad pawar
काँग्रेसच्या काळात एका रुपयाचे  १५ पैसे व्हायचे, आता मी एक बटण दाबले आणि…; पंतप्रधान माेदींकडून शरद पवार यांचे नाव न घेता टीका
Bhavana Gawali on yavatmal loksabha constituency
“मैं मेरी झांसी नहीं दूंगी”, भावना गवळी लोकसभा उमेदवारीसाठी ठाम; म्हणाल्या, “१३ खासदार शिंदेंबरोबर गेलो तेव्हा…”
annie raja
“केरळमधून निवडणूक लढवून राहुल किंवा काँग्रेसला काय फायदा?” सीपीआय वायनाडच्या उमेदवार म्हणाल्या, “मला वाटते…”

हेही वाचा >>> ‘पदवीधर’ मध्ये काट्याची लढत, महाविकास आघाडीचे भाजपसमोर कडवे आव्हान

एकूणच महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून अडबाले यांना बघितले जाते. दरम्यान, संपलेल्या आठवड्यात शिवसेनेने डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती केली. याच वंचितचा उमेदवार नागपुरात रिंगणात आहे. त्यामुळे येथे शिवसेना वंचितसोबत आहे की महाविकास आघाडीसोबत असा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, सध्यातरी शिवसेनेचे नेते अडबाले यांच्या प्रचार करीत आहेत. शुक्रवारी खासदार विनायक राऊत यांची सभा झाली. त्यांनी अधिकृतपणे अडबालेंच्या पाठीशी असल्याचा निर्वाळा दिला. दुसरीकडे आंबेडकर यांनीही वंचितचे उमेदवार खोब्रागडे यांच्यासाठी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला. शिक्षक मतदारसंघात प्रथमच वंचितने त्यांचा उमेदवार दिला आहे.