scorecardresearch

नागपूर: २०२४ मध्ये अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम; काय म्हणाले बावनकुळे

काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

नागपूर: २०२४ मध्ये अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम; काय म्हणाले बावनकुळे
( संग्रहित छायचित्र ) फोटो सौजन्य : लोकसत्ता

बारामतीतील माझ्या एका दौ-यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रमाची भाशा बोलत आहे. प्रत्यक्षात कुणाचा कार्यक्रम करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत अजित दादांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असे दावाभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. विधानभवन परिसरात प्रसिद्धी माध्यमांशी ते बोलत होते.

हेही वाचा >>> विरोधकांचा बहिष्कार, चर्चेशिवाय लोकायुक्त कायदा मंजूर, देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अण्णा हजारे…”

बावनकुळे पुढे म्हणाले, २०२४ मध्ये महाविकास आघाडीला उमेदवार देखील भेटणार नाही. बारामतीचा विकास म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. अजित पवारांच्या वागण्याबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम २०२४ मध्ये जनतेकडून होईल. त्यांचे कुठलेही चॅलेंज आम्ही स्वीकारायला तयार आहे.

हेही वाचा >>> …अशा बोलघेवड्या लोकांना तंबी द्या”, फडणवीस अमित शाहांना पाठवणार पत्र, म्हणाले “हे पूर्णपणे चुकीचे

राष्ट्रवादी सत्तेत आली तेव्हा सत्तेची फळ अजितदादांनी चाखली.पश्चिम महाराष्ट्राचा विकास केला नाही. सत्तेपासून पैसा आणि पैसापासून सत्ता असे त्यांचे राजकारण  आहे. त्यांनी आपल्या पक्षाचे बघायला हवे. ते ओबीसीचे मारेकरी आहेत, असा आरोप बावनकुळे यांनी केला. लोकायुक्त कायदा हा महत्वाचा आहे. ज्यांनी ५० वर्ष सत्तेपासून पैसा कमविला. त्यांना लोकायुक्ताची भीती वाटते आहे. घोटाळ्याचे बॉम्ब आमच्याजवळही आहे. पीएमआरडीएमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी किती जमिनी ग्रीनबेल्टच्या यलोबेल्टमध्ये केल्या एवढे जरी मांडले तरी भरपूर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने भ्रष्टाचाराच्या गोष्टी बंद केल्या पाहिजे, असेही बावनकुळे म्हणाले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 14:14 IST

संबंधित बातम्या