नागपूर : कारगिल जिल्ह्यातील हंदरमान गावातून भारत-पाक सीमाषा ओलांडून पाकिस्तान प्रवेश केलेल्या नागपूरच्या एका महिलेला दहा दिवसांनी पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी भारताकडे सुपूर्द केले. नागपूरच्या ४३ वर्षीय सुनिता जामगडे १४ मे रोजी सीमारेषा ओलाडून पाकिस्तान गेल्या होत्या. त्यांना शनिवारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
जामगडे यांनी दहा दिवसांपूर्वी सीमा पार केली होती. त्यानंतर तिला पाकिस्तानी सैन्याने पकडले. पाकिस्तान रेंजर्सने तिला सीमा सुरक्षा दल यांच्याकडे सुपूर्द केले आहे आणि बीएसएफने तिला अमृतसर पोलिसांना सुपूर्द केले. दरम्यान सुनिताला परत आणण्यासाठी एक अधिकारी आणि दोन महिला कॉन्स्टेबल यांचे एक पथक अमृतसरला पाठवण्यात आले आहे, असे पोलिस उपआयुक्त निकेतन कडम म्हणाले.नागपुरात आल्यानंतर तपास करणार केली जाणार आहे. त्या गुप्तचर किंवा इतर कोणत्याही बेकायदेशीर कारवायांमध्ये त्या सामील आहे काय, याचा तपास केला जाणार आहे.
जामगडे यांनी त्यांचा १२ वर्षीय मुलगा कारगिलमध्ये सोडून पाकिस्तानात प्रवेश केलाहोता. त्यानंतर हा मुलगा बालकल्याण समितीच्या देखरेखीत आहे. त्याला देखील लवकरच नागपूरमध्ये आणला जाईल. सुनिता नागपूरच्या एका रुग्णालयात परिचारिकाचे काम करीत होती. त्यानंतर त्यांनी घरोघरी जावन कापड विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार ती मानसिकरित्या आजारी आहे आणि ती स्थानिक रुग्णालयात उपचार घेत आहे.
सुनिता यांनी नियंत्रण रेषा ओलांडण्यापूर्वी कर्गिलमधील एका स्थानिक हॉटेलमध्ये त्यांच्या मुलास सोडले होते. तिच्या बेपत्ता होण्यामुळे भारत-पाक संघर्षानंतर सीमा सुरक्षेच्या चिंतेत वाढ झाली होती. सूत्रांनी सांगितले की सुनिता अनेक महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये पाद्री म्हणून काम करणाऱ्या जुल्फिकार यांच्यासोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत होती. तिचा सीमा ओलांडणे त्या व्यक्तीला भेटण्याचा प्रयत्न होता.