नागपूर : गणेशोत्सवातील वेगवेगळ्या वादग्रस्त देखाव्यांमुळे सतत चर्चेत राहणाऱ्या प्रसिद्ध गुलाब पुरीच्या गणेशाची रविवारी सायंकाळी स्थापना होणार आहे. राजकीय, धार्मिक आणि सामाजिक विषयावर वेगवेगळे देखावे करणाऱ्या गुलाब पुरीच्या गणेशोत्सवात यावेळी कुठला देखावा राहणार आहे? याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले आहे. नागपूर गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध आहे हजारो सार्वजनिक मंडळे मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. विविध देखावे तयार करतात. सजावट केली जाते. ती बघण्यासाठी नागपूरकर गर्दी करतात. काहींनी वेगळी ओळख तयार केलली. त्यात पुरीच्या गणपतीचा समावेश आहे.

काय आहे परंपरा

मध्य नागपुरातील पाचपावली परिसरात नागपुरातील हा गुलाबपुरीचा गणपती प्रसिद्ध आहे तो गणेशस्‍थापनेच्या निमित्ताने हाताळण्यात येणाऱ्या वादग्रस्त विषयांमुळे. १९५९ पासून चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाच्यावतीने गणेशोत्सवाची पाचपावली परिसरात सुरुवात झाली. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गुलाब पुरी यांनी देखाव्यातून सामाजिक संदेश देणा-या गणपतीची प्रतिष्ठापणा करण्याची परंपरा सुरू केली. यामुळे या गणेशोत्सवाची समाजात वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे दरवर्षी गुलाब पुरी यांच्या गणेशोत्सवात दरवर्षी कुठला देखावा केला जातो याकडे सर्वाचे लक्ष लागलेले असते.

हे ही वाचा…बुलढाणा: सर्वांचेच लक्ष्य संजय गायकवाड! पण चक्रव्यूहाचा भेद करणार कोण?

यंदाच्या देखाव्याबाबत उत्सुकता

यावर्षी सुद्धा आज गणेशोत्सवात गणपतीची स्थापना केली जाणार आहे. विशेषत म्हणजे हा गणपती गणेश चतुर्थीच्या दिवशी न बसवता गणेशोत्सवा दरम्यानच्या कुठल्याही दिवशी बसवला जातो. पूर्वी गुलाब पुरी यांनी गणपतीची स्‍थापना करताना वादग्रस्त देखावा केला की लगेच ती मूर्ती पोलिस जप्त करायचे आणि आजही ती परंपरा कायम आहे. निवडणुकीत राम मंदिराचे आश्वासन द्यायचे आणि सत्तेत आल्यावर रामालाच न्यायालयात आणायचे, त्याचप्रमाणे वाढीव कर, वीजबिल, नवीन मोटर वाहन कायद्यातील दंडाची रक्कम लोकांचे कंबरडे मोडणारे, संविधा विरोधी सरकार असे अनेक वादग्रस्त प्रसंग त्यांनी देखाव्यातून मांडले आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अमित शहा यांच्याही प्रतिमा या देखाव्यात या आधी उभारण्यात आल्या आहेत. २०१० साली पुरी यांनी जो देखावा केला होता त्यात तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या प्रतिमा उभारल्या होत्या. त्यामुळे त्यावेळी पोलिसांनी या प्रतिकृती जप्त केल्या होत्या.

हे ही वाचा…हवामान बदलामुळे डासांची शक्ती चारपट वाढली; डेंग्यू, चिकनगुनिया वाढण्यामागचे कारण अभ्यासातून उघड

चंद्रशेखर आझाद गणेश मंडळाच्यावतीने पुरी हे गेल्या १९५९ पासून गणपतीची स्थापना करतात. त्यासोबत ज्वलंत सामाजिक समस्यांवर आधारित देखावेही असतात. १९९३ साली गुलाब पुरी यांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे चिरंजीव चंद्रशेखर, नरेंद्र यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. २००५ साली न्यायालयाने पुरींना गणपतीची प्रतिष्ठापना करू देण्याचे आदेश दिले होते. यावेळी चंद्रशेखर पुरी यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, आम्ही सरकारच्या विरोधात किंवा एखाद्या राजकीय विषयावर देखावा तयार करतो आणि आमच्या वडिलांपासूनची परंपरा आहे. आजही आम्ही पाचपावली परिसरात वेगळा देखावा तयार केला आहे. देखाव्यात ठेवण्यात येणारे जे काही पुतळे उभे करणार आहे ते वेळेवर ठेवणार आहे. त्यामुळे यावेळी गुलाब पुरीच्या देखाव्यात काय राहणार याकडे आता नागपुरकरांचे लक्ष लागले आहे.