शहराच्या मध्यभागी असलेल्या विधानभवनासमोरील निर्माणाधीन इमारतीमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. ही घटना आज सोमवारी उघडकीस आली. अद्याप महिलेची ओळख पटली नाही. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी नऊ वाजता काही युवक विधानभवनासमोरील निर्माणाधीन इमारतीत गेले होते. त्यांना एका ४५ ते ५० वर्षीय महिलेचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सदर पोलिसांचे पथक त्या निर्माणाधीन इमारतीत दाखल झाले. त्यांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि मेयो रुग्णालयात रवाना केला. महिलेच्या डोक्यावर दगडाने वार केल्याचे प्रथमदर्शनी पोलिसांनी सांगितले. त्यामुळे महिलेचा खून केल्याचे स्पष्ट होत आहे. महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्या दृष्टीनेही पोलिसांनी तपास करणे सुरू केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Naked body of a woman in an under construction building amy
First published on: 25-07-2022 at 18:20 IST