लोकसत्ता टीम

गडचिरोली : गडचिरोली – चिमूर लोकसभा मतदारसंघात दहाव्या फेरीअखेर काँग्रेसच्या डॉ. नामदेव किरसान यांनी तब्बल ५३२८९ मतांची आघाडी घेतली आहे. यामुळे मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांची चिंता वाढल असून आणखी मतमोजणीच्या १६ फेऱ्या शिल्लक असल्याने भाजपचे अशोक नेते आघाडी घेतील अशी अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

Nagpur congress
विधानसभेची नांदी, नव्या उमेदवाराला संधी… काँग्रेस दक्षिण नागपूरमध्ये…
Wardha Political Aspirants Emerge After Lok Sabha Results Congress Leaders Seek MLA Tickets
काँग्रेसला सुगीचे दिवस…पण, दावेदारांसोबतच डोकेदुखीही वाढली…वर्धेत तर एका नेत्याने…
Solapur Lok Sabha constituency, Sushilkumar Shinde, Sushilkumar Shinde Reveals BJP Leaders Supported Praniti Shinde, Praniti Shinde , congress, Solapur news, marathi news, latest news, loksatta news,
सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी भाजप नेत्यांनी लावला हातभार, सुशीलकुमार शिंदे यांचा गौप्यस्फोट
ramesh keer, Congress, niranjan davkhare,
काँग्रेसचे रमेश कीर मतदारांवर प्रभाव पाडण्यात अपयशी, कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरेंची हॅटट्रीक
Praniti Shinde, Assembly,
प्रणिती शिंदे यांची विधानसभेसाठी कसोटी
kp patil marathi news
के. पी. पाटील यांची पावले ‘मविआ’कडे ; उत्पादन शुल्क खात्याची कारवाई ‘बिद्री’ कारखान्यावर
It has been two years since the split in Shiv Sena
शिवसेनेतील फुटीला दोन वर्षे पूर्ण; निवडणुकीत ठाकरे गट वरचढ
kiran choudhry joins bjp
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या अडचणीत वाढ; माजी मुख्यमंत्र्यांच्या सुनेचाच भाजपात प्रवेश

गडचिरोली-चिमूर या मतदासंघात भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते विरुद्ध काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान अशी लढत आहे. शहरातील कृषी महाविद्यालय इमारतीत मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १४ टेबल याप्रमाणे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीचे आकडे साडेदहा वाजता बाहेर आले. यात डॉ. नामदेव किरसान यांना अशोक नेते यांच्यापेक्षा तीन हजारांचे मताधिक्क्य होते. त्यानंतर दहा फेऱ्यापर्यंत किरसान यांनी ५० हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली. यामुळे काँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

आणखी वाचा-Vidarbha Election Results : विदर्भातील निवडणूक निकालाने भाजप कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थता

एकूण २६ फेऱ्या होणार आहेत. स्वतःचा मतदारसंघ असलेल्या आमगावातच डॉ. किरसान हे पिछाडीवर असून इतर पाचही विधानसभा क्षेत्रांत मात्र ते आघाडीवर आहेत. दरम्यान, गडचिरोली – चिमूर मतदासंघांत १६ लाख १७ हजार २०७ इतके मतदार आहेत. यापैकी ११ लाख ६२ हजार ४७६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी प्रक्रिया सुरू असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अंतिम निकाल स्पष्ट होईल.