scorecardresearch

सात महिन्यांच्या बंदीवासानंतर चित्त्यांनी ठोकली धूम! नामिबियातील चित्ते अखेर कुनोच्या खुल्या जंगलात

नामिबिया येथून आणलेल्या ‘एल्टन’ आणि ‘फ्रेडी’ या दोन चित्त्यांना बुधवारी सायंकाळी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील खुल्या जंगलात सोडण्यात आले.

Namibian cheetahs Elton
नामिबियातील चित्ते अखेर कुनोच्या खुल्या जंगलात (image – @KunoNationalPrk/twitter)

नागपूर : नामिबिया येथून आणलेल्या ‘एल्टन’ आणि ‘फ्रेडी’ या दोन चित्त्यांना बुधवारी सायंकाळी मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील खुल्या जंगलात सोडण्यात आले. यापूर्वी ‘ओबान’ आणि ‘आशा’ या दोन चित्त्यांना सोडण्यात आले होते. कुनोतील वनरक्षक आणि इतर वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने चित्त्यांवर नजर ठेवली जात आहे.

चित्ता प्रकल्पाबाबत केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली निर्णय घेण्यात येत आहेत. कुनो राष्ट्रीय उद्यानात सात महिने खुल्या पिंजऱ्यात ठेवल्यानंतर बुधवारी संध्याकाळी एल्टन आणि फ्रेडी या दोन चित्ता बांधवांना खुल्या जंगलात सोडण्यात आले. यापूर्वी ११ मार्चला एक नर ओबान आणि मादी आशा चित्ता यांना खुल्या जंगलात सोडण्यात आले होते.

Video credit – @ANI_MP_CG_RJ/ twitter

हेही वाचा – गडचिरोली: नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त

हेही वाचा – “काँग्रेसची विचारसरणी आदर्श, मात्र नेते नालायक”, माजी आमदार अशोक शिंदेंनी संताप व्यक्त करीत काँग्रेसला ठोकला रामराम

सप्टेंबर २०२२ मध्ये नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना विलगीकरण आणि देखरेखीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर जंगलात सोडण्यात आले होते. कुनो व्यवस्थापनाने विशेष बंदोबस्तात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ‘एल्टन’ आणि ‘फ्रेडी’ या दोन्ही चित्त्यांना खुल्या जंगलात सोडले. जंगलात सोडताच तब्बल पाच किलोमीटरपर्यंत ते दूर पळताना दिसून आले. ‘ओबान’ आणि ‘आशा’ हेही आता कुनोच्या वेगवेगळ्या भागात फिरतानाचे छायाचित्र समाजमाध्यमावर पसरले होते. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ‘एल्टन’ आणि ‘फ्रेडी’ यांच्या हालचालीवर लागल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 15:38 IST

संबंधित बातम्या