वर्धा : सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांचा हृदय विकाराच्या झटक्याने म्हणजेच हार्ट अटॅकने मृत्यू झाला. त्यांपूर्वी त्यांनी डॉक्टर मित्रास बरे वाटत नसल्याचा मेसेज केला होता, अशी माहिती पुढे आली आहे. पण असा मेसेज करून थांबण्यापेक्षा स्वतः फोन करून डॉक्टरांना तब्येत स्थिती सांगितली असती तर खूप बरे झाले असते. अशी वैद्यकीय वर्तुळत चर्चा होत आहे. म्हणून
घरी एकटे असताना हार्ट ॲटक आल्यास काय करावे? याची ही दक्षता.

मृत्यूचे प्रमुख कारण

हदयविकाराचा झटका ही जागतिक स्तरावर तसेच भारतात मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक ठरत आहे. जागतिक आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी लाखो लोकांचा मृत्यू हृदयविकारामुळे होतो. अशा वेळी एखादी व्यक्ती घरी पूर्णपणे एकटी असताना तिला हृदयविकाराचा झटका आला, तर काय करावे, हा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होतो. हृदय विकार तज्ञ काही सूचना करतात.

योग्य संपर्क साधा.

घरी एकटे असताना अचानक छातीत तीव्र वेदना, दाब किंवा अस्वस्थता जाणवल्यास सर्वप्रथम रुग्णवाहिकेसाठी आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. भारतात वैद्यकीय आणीबाणीसाठी ११२ किंवा १०८ या क्रमांकावर त्वरित कॉल करावा. ही पायरी सर्वात महत्त्वाची आहे, कारण वैद्यकीय मदत लवकरात लवकर पोहोचणे अत्यंत गरजेचे असते. संपर्क साधल्यानंतर तत्काळ घराचा मुख्य दरवाजा उघडावा किंवा त्याची कडी उघडी ठेवावी. रात्र असेल तर घरातील आणि घराबाहेरील दिवे सुरू करावेत. यामुळे रुग्णवाहिकेतील वैद्यकीय पथकाला तुमचे घर सहज ओळखता येईल. तसेच रुग्णाची प्रकृती बिघडून तो असाहाय्य किंवा बेशुद्ध झाला, तरी वैद्यकीय पथकाला घरात प्रवेश करताना अडथळा निर्माण होणार नाही.

आरामदायी स्थितीत पडावे

ॲटक येऊन गेल्यानंतर रुग्णाने शांतपणे खाली बसावे किंवा सोफ्यावर अथवा जमिनीवर झोपावे. ज्या स्थितीत श्वास घेणे सर्वात सोपे आणि आरामदायी वाटेल ती स्थिती निवडावी. पाय थोडे उंचावर ठेवून झोपल्यास बहुतांश जणांना आराम मिळतो. या सर्व प्रक्रिया करत असतानाच आपल्या जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला फोन करून परिस्थितीची कल्पना द्यावी. यामुळे आपण कोणत्या रुग्णालयात जात आहोत आणि आपत्कालीन मदत पोहोचत आहे, याची माहिती जवळच्या व्यक्तींना राहते. आपत्कालीन प्रसंगी सतर्कता आणि योग्य नियोजनच रुग्णाचा मौल्यवान जीव वाचवू शकते.

डॉ. अरुण पावडे म्हणतात…

प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ व महाराष्ट्र वैद्यकीय संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अरुण पावडे हे सांगतात की आपण स्वतःकडे दुर्लक्ष करतो हे चूक आहे. घरच्या लोकांना आपल्या आजाराबद्दल माहिती असावी. त्यावरची औषधे पण माहित असावी. बेडच्या बाजूला अत्यावश्यक फोन नंबर म्हणजे डॉक्टर, Care Taker यांचे नंबर मोठ्या अक्षरात लिहून ठेवावे. हार्ट अटॅकची शंका असल्यास Aspirin 150 दोन गोळया त्वरित घ्याव्यात. Tab Sorbitrate ची 5 Mg गोळी जिभेखाली ठेवावी. शांत पडून रहावे.

अशी स्थिती ठेवावी

कोणतेही शारीरिक श्रम करू नये. श्वास घेण्यास त्रास होत असल्यास पाठीखाली, मानेखाली उशी देऊन किंवा बेडला डोक्यकडून थोडे वर करावे. रुग्णालयात नेतांना रुग्णास नं चालवीता न्यावे. अत्यंत गंभीर स्थितीत श्वास बंद पडत असेल किंवा हृदयाचे ठोके बंद पडत असतील तर CRR माहित असणे आवश्यक आहे. हे Golden Hour असतात. सर्व ती काळजी घेतली पाहिजे. केवळ मेसेज करून थांबणे बरे नव्हे.