नागपूर : ज्येष्ठ अभिनेते व परखड व्यक्तव्यासाठी प्रसिद्ध नाना पाटेकर यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. हार्ट अटॅकने त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टी, राजकारण, सामाजिक क्षेत्रातील सर्वांनाच धक्का बसला आहे. हार्ट अटॅकबाबत नाना यांनी याच वर्षी १८ मे रोजी नागपुरात झालेल्या कार्यक्रमात भीती व्यक्त केली होती.
…म्हणून नटसम्राट नाटक केले नाही
नागपुरात १८ मे रोजी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या २५ व्या वर्षानिमित्त रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात सोंमवारी आयोजित जलक्रांती परिषद आयोजित केली होती. यावेळी व्यासपीठावर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, ‘नाम’ फाउंडेशनचे सचिव अभिनेते मकरंद अनासपुरे, जलसंधारण मंत्री संजय राठोड, वित्त व कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर निता ठाकरे, खासदार माया इवनाते, पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, ‘माफसू’चे कुलगुरू नितीन पाटील यांच्यासह आमदार, जलतज्ज्ञ उपस्थित होते.
यावेळी नाना पाटेकर यांनी भीती व्यक्त करीत ‘नटसम्राट’ नाटक का केले नाही, याचे कारण सांगितले होते. एखादी भूमिका करायची असली तरी त्यात सर्वोत्कृष्ट अभिनय करताना जीव ओतावा लागतो. आतापर्यंत ज्या अभिनेत्यांनी नटसम्राट नाटकात प्रमुख भूमिका केली, त्या सर्वांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. भूमिकेशी समरस होताना मी नाटक केले असते तर २५ प्रयोगानंतरही माझाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला असता. त्यामुळे मी नाटक न करता ‘नटसम्राट’ चित्रपटात भूमिका केली, असा गौप्यस्फोट अभिनेते नाना पाटेकर यांनी केला होता. नाना पाटेकर यांनी विक्रम गोखले हे उत्कृष्ट अभिनेते होते, त्यांची उंची मला गाठणे शक्य नाही, असेही नमुद केले. ‘नटसम्राट’ नाटकात डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले आदींनी उत्तम अभिनय केला. या नाटकांचे अनेक प्रयोग झाले. प्रत्येक प्रयोगात जीव ओतून भूमिका केली, असे ते म्हणाले.
गडकरी यांना दिला होता ‘हा’ प्रस्ताव
नाटक, चित्रपटातून मिळणारा पैसा, समाधानापेक्षा ‘नाम’ फाऊंडेशनच्या माध्यमातून शेतकरी, समाजासाठी केलेल्या कामाचे समाधान खूप जास्त आहे. एकाट्याने केलेल्या कामापेक्षा सामुहिकरित्या केलेली कामे चांगली असतात. येत्या काळात जलसंवर्धनासाठी पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था व ‘नाम’ एकत्र येऊन काम करू या, असा प्रस्ताव नाना पाटेकर यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना दिला होता. लोकांचा आमच्यावरील विश्वासामुळे आता ‘नाम’चे काम वाढले आहे. ही धुरा योग्य व्यक्तीच्या हाती जाणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले होते.
सरकारी यंत्रणेच्या कामावरही ठेवले होते बोट
माझे गाव माझा भारत समजून प्रत्येकाने काम केले तर देश समृद्ध होईल. परंतु इतरांशी स्पर्धेतून आपला गोंधळ उडतो. स्पर्धा स्वत:शी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सरकारी यंत्रणेवरही बोट ठेवले होते. प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन का करावे लागते, जे आम्हाला दिसते, ते यांना का दिसत नाही, असा सवाल त्यांनी केला होता.
‘नाम’ फाउंडेशनने ७० एकरात तलाव बांधला
नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशनने विदर्भातही अनेक कामे करीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले होते. ‘नाम’ फाऊंडेशनने सुरुवातीला नागपूर जिल्ह्यातील कुही टाकळी गावात ७० एकरात तलाव बांधला. आज येथील २५० एकर जमिन ओलाखाली आली. विदर्भात १० जिल्ह्यात काम सुरू आहे.
