"हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही...", नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य | Nana Patekar tell incident of Nitin Gadkari about Congress leader program in Nagpur | Loksatta

“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य

“काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं,” अशी माहिती नाना पाटेकरांनी दिली.

“हे फक्त गडकरीच करू शकतात, तो काँग्रेसचा नेता असूनही…”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य
नाना पाटेकर व नितीन गडकरी (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नितीन गडकरींचं तोंडभरून कौतुक केलं. “काँग्रेसचा नेता असूनही नितीन गडकरींनी मला रणजीत देशमुखांच्या कार्यक्रमाला जाण्यास सांगितलं,” अशी माहिती नाना पाटेकरांनी दिली. तसेच हे फक्त गडकरीच करू शकतात, असंही नमूद केलं. ते खासदार (संसद) सांस्कृतिक महोत्सव २०२२ च्या उद्घाटन समारंभात बोलत होते.

नाना पाटेकर म्हणाले, मी या कार्यक्रमाला उशिरा येण्याचं कारण दुसऱ्या ठिकाणी रणजीत देशमुख यांच्या वडिलांच्या पुतळ्याचं अनावरण होतं. तर नितीन गडकरींनी तो नेता काँग्रेसचा असूनही ती चांगली माणसं आहेत, नाना तुम्ही तिथं जा असं सांगितलं.

“हे फक्त गडकरीच करू शकतात”

ठतसेच तो कार्यक्रम करून या, थोडा उशीर झाला तरी चालेल, असंही नमूद केलं. हे फक्त गडकरीच करू शकतात. रणजीत देशमुख वेगळ्या पक्षाचे, काँग्रेसचे असूनही त्यांनी ती खूप चांगली माणसं आहेत असं म्हटलं,” असं नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

“गडकरींनी सांस्कृतिक महोत्सवाची ताकद ओळखली”

सांस्कृतिक महोत्सवावर बोलताना नाना पाटेकर म्हणाले, “संध्याकाळी थकल्या भागल्यावर मला काहीतरी आनंद हवा असतो. त्यासाठी गप्पा मारायच्या असतात, बोलायचं असतं. आनंदाची व्याख्या माणसागणिक बदलत जाईल. खरं सांगतो इतक्या वर्षांनंतर इतक्या हिरिरीने विचार करणारा माणूस म्हणजे नितीन गडकरी. गडकरींनी सांस्कृतिक महोत्सव या माध्यमाची ताकद बरोबर ओळखली आहे.”

“हाही एक सुक्ष्म राजकारणाचाच भाग”

“हे माध्यम म्हणजे केवळ करमणूक नाही. इथं सगळ्या जाती-धर्माची माणसं एकत्र येत असतात. हाही एक सुक्ष्म राजकारणाचाच भाग आहे. सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्यात संवाद झाला पाहिजे,” असं मत नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “एकनाथराव, आम्ही कर भरून आमच्या चौकशा, तुमच्या चौकशा का होत नाहीत?”, नाना पाटेकरांच्या थेट प्रश्नावर फडणवीस म्हणाले…

“मला इथं पुरुष नाटकाचा प्रयोग करता येईल का?”

“मला असं वाटतं रणांगणात यायचं आणि कुस्ती नाही. मी पुरुष नावाचं नाटक करत असतो तर मी विचारलं असतं की मला इथं पुरुष नाटकाचा प्रयोग करता येईल का?” असंही त्यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 10:47 IST
Next Story
‘शिवसेना परिवारातील मी शेंडेफळ, मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नाही’; सुषमा अंधारे