scorecardresearch

Premium

“…ही तर तरुणांची थट्टाच”, नागपुरातील रोजगार महामेळाव्यावरून नाना पटोले यांची भाजपावर टीका

शनिवारपासून दोन दिवस भाजपाने नागपुरात रोजगार महामेळावा घेऊन तरुणांची थट्टा चालवली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Nana Patole criticism of BJP
"…ही तर तरुणांची थट्टाच", नागपुरातील रोजगार महामेळाव्यावरून नाना पटोले यांची भाजपावर टीका (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : सरकार जनतेचे एकही प्रश्न सोडवू शकले नाही. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कापूस, ऊस, द्राक्ष उत्पादक आज त्यांच्या हातात काही नाही. काँग्रेस पक्षाने सरकारवर हल्लाबोल करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून दोन दिवस भाजपाने नागपुरात रोजगार महामेळावा घेऊन तरुणांची थट्टा चालवली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

नाना पटोले नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्या विधानभावनावर काँग्रेसचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. हा मोर्चा बेरोजगारी, महागाई या विषयाला धरून असणार आहे. २३ सप्टेंबर रोजी पावसाने मोठे नुकसान केले. मात्र अजूनही मदत मिळाली नाही. अनेक ठिकाणी रस्ते खोदकाम सुरू आहे. रस्त्याच्या माध्यमातून भ्रष्टाचार सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

8 to 10 mla skip congress party meeting in lonavala
काँग्रेस पक्ष बैठकीला ८-१० आमदारांची दांडी; लोणावळा येथे आज सर्व आजी, माजी आमदारांची बैठक, पक्ष एकसंध असल्याचा नाना पटोलेंचा दावा
Uddhav Thackeray visit to Shirdi
उद्धव ठाकरेंच्या शिर्डी दौऱ्यात गटबाजीचे दर्शन
This is BJP manifesto Congress reply to the government in the Lok Sabha on the white paper
हा भाजपचा जाहीरनामा! श्वेतपत्रिकेवरून लोकसभेत काँग्रेसचे सरकारला प्रत्युत्तर
Uddhav Thackeray on Narendra Modi
“पंतप्रधान मोदी रोज दोन-तीन किलो शिव्या खातात, मग आम्ही..”, भाजपा नेत्यांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

हेही वाचा – ‘सह्याद्री’वर सोयाबीन-कापूस प्रश्नावर बैठक; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उपमुख्यमंत्री फडणवीसांसमवेत तुपकरांची चर्चा

राज्यात सध्या ओबीसी व मराठा आरक्षणावरून सरकार प्रायोजित आंदोलन सुरू आहे, ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटवून सामाजिक परिस्थिती मलीन करण्याचे काम सुरू आहे, अधिवेशनात सरकारच्या पापाचा पाढा वाचणार आहे. आज दोन समाजांत अंतर वाढले आहे. भविष्यात कमी होईल की नाही, अशी परिस्थिती आहे. महाराष्ट्राला आपसात भांडवत कलंकित करण्याचे काम सुरू आहे, असेही पटोले म्हणाले.

हेही वाचा – “आयोगावर दबाव आणण्यापेक्षा जातनिहाय जनगणना घोषित करा”, आमदार यशोमती ठाकूर यांची मागणी; म्हणाल्या…

आरक्षण मिळण्यासाठी संवैधनिक पद्धती आहे. जातीय सर्वेक्षण करून त्यांना आरक्षण देता येऊ शकते. जातीय सर्वेक्षण करून यातून तोडगा काढू शकतो. मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत, अजूनही अनेक जाती प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी जनगणना गरजेची आहे. आज विविध समाजांचे अनेक प्रश्न आरक्षणाच्या नावावर निर्माण झाले आहेत, असेही पटोले यांनी सांगितले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nana patole criticism of bjp over the rojgar mahamelava in nagpur vmb 67 ssb

First published on: 10-12-2023 at 16:01 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×