नागपूर : महाराष्ट्रात सेलिब्रेटी, गावचे सरपंच किंवा सर्वसामान्य जनता सुरक्षित नाही. पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर काम करतात. पोलिसांनी अद्याप आरोपीला पकडलेले नाही. हे फडणवीस सरकारचे अपयश आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. ते शनिवारी त्यांच्या नागपूर निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली असून गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही. आमचे कुणी काही बिघडवू शकत नाही अशी मानसिकता झाली आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेला फक्त गृहमंत्रीच जबाबदार नाहीत, मंत्रिमंडळातच ६५ टक्के मंत्री दागी असतील तर यापेक्षा वेगळे चित्र काय दिसणार आहे, अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला जाती धर्माच्या दृष्टीकोणातून पाहू नका, असे पटोले म्हणाले.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या व परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत झालेला मृत्यू या घटनाही जाती धर्माशी जोडून पाहणे चुकीचे आहे. मराठा-ओबीसी वाद भाजपा युती सरकारनेच निर्माण केला, त्यातून जनतेचे मुळ प्रश्न बाजूलाच पडले. शेतमालाला भाव मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढत आहेत, शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, युवकांना बरोजगारीचा सामना करावा लागत आहे, महागाई गगनाला भिडली आहे, हे प्रश्न महत्वाचे आहेत. जाती धर्माच्या वादात न पडता सरकारविरोधात सर्वांनी आवाज उठवला पाहिजे,असेही नाना पटोले म्हणाले.

Frequent attacks on teams preventing illegal sand mining Threat to kill female Talathi
वाळू माफियावर महसूल प्रशासनाचा वचक नाही? अवैध वाळू उपसा रोखणाऱ्या पथकांवर वारंवार हल्ले
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rahul Kamble wins Mahavitaran Shri in bodybuilding competition pune print news
शरीरसौष्ठव स्पर्धेत राहुल कांबळे ‘महावितरण श्री’
कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार? (फोटो सौजन्य लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
UCC in Gujarat : कोण आहेत न्यायमूर्ती रंजना देसाई? गुजरातमध्ये यूसीसीचा मसुदा कोण तयार करणार?
people of Pardhi community will get caste and birth certificate
आयुष्यात ‘हे’ प्रथमच जातीचा दाखला पाहणार, पालकमंत्र्यांनी असे काय केले की…
There was no competition for post of guardian minister of Satara says Shambhuraj Desai
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी स्पर्धा नव्हतीच- शंभूराज देसाई
Chhatrapati sambhajinagar loksatta news
सिल्लोड भाजप शहराध्यक्षांसह तिघांविरुद्धचा गुन्हा रद्द, माजीमंत्री अब्दुल सत्तारांविरुद्धचे वक्तव्य प्रकरण
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट

हेही वाचा…नितीन गडकरी म्हणतात माझ्या मुलाने ३०० कंटेनर मासोळी ‘सर्बिया’ला दिली…

निवडणुकीनंतर बहिण नावडती

विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची मते हवी होती म्हणून सर्व बहिणींना योजनेचा लाभ दिला, याच बहिणींच्या मतांवर सत्तेत आले आणि आता भाजपा युती सरकारला लाडकी बहिण योजनेतील त्रुटी दिसत आहेत का? बहिणींची मते घेताना या त्रुटी व पारदर्शकता आठवली नाही का? सरकार आल्यानंतर पडताळणी करण्याची गरज का पडावी? बोगस लाभार्थी बहिणींकडून पैसे परत घेण्याची धमकी मंत्री देत आहेत, यातून भाजपा युतीचा खरा चेहरा उघडा पडला आहे. परंतु भाजपा युती सरकारने जाहिर केल्याप्रमाणे प्रत्येक लाडक्या बहिणीला सरसकट २१०० रुपये दिले पाहिजेत, असेही नाना पटोले म्हणाले.

Story img Loader