scorecardresearch

‘कुणाच्या घरातील भांडणाशी देणे-घेणे नाही’; नाना पटोले म्हणाले, ‘जिसका नाम होता है, उसी को…’

पटोले म्हणाले, काँग्रेसला महाराष्ट्रात मिळत असलेलं यश बघवत नसल्यामुळे माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

nana-patole
नाना पटोले (संग्रहित छायाचित्र)

कुणाच्या घरातील भांडणाशी पक्षाला काहीही देणेघेणे नाही. काँग्रेसला आता महाराष्ट्रात चांगले यश मिळू लागले आहे आणि भविष्यात हा आलेख वाढताच राहणार आहे. कदाचित हे कुणाला रुचत नसेल म्हणून माझी बदनामी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असतील, असे प्रतिउत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षातील विरोधकांना दिले. त्यांनी आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

हेही वाचा- अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख मुंबईबाहेर जाऊ शकणार

त्यांना काँग्रेस पक्षातील काही ज्येष्ठ आणि तरुण नेते तुमच्यावर सातत्याने आरोप करीत आहेत. यामुळे तुमची बदनामी होत आहे असे वाटत नाही का, असे विचारले असता नाना म्हणाले, ‘जिसका नाम होता है, उसी को बदनाम किया जाता है’. त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, असेही ते म्हणाले. विदर्भात नागपूर शिक्षक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठे यश मिळाल्यानंतर ते आज प्रथमतः नागपुरात आले होते. त्यांनी या यशाचे श्रेय महाविकास आघाडीच्या एकोप्याला दिले.

हेही वाचा- “आत्मदहन करू द्या, अथवा खुशाल गोळ्या घाला”, शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक, ११ फेब्रुवारीला आत्मदहनाचा निर्णय

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. याबाबत विचारले असता, नाना पटोले म्हणाले, सर्वप्रथम बाळासाहेबांना आज त्यांच्या वाढदिवसाबद्दल मी शुभेच्छा देतो. बाळासाहेबांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा आणखी राजकीय उत्कर्ष होवो, असे म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा- वर्धा : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानपिचक्या; भाजप नेत्यांना आले भान, मगच मांडव भरला छान

विजयी उमेदवारांचा १५ ला सत्कार

काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीची बैठक दर तीन महिन्यांनी घ्यायची असते. पण काही लोक तर वर्ष-वर्षभर ती बैठक घेत नव्हते. गेल्या महिन्यात नागपुरात आमची प्रदेश कार्यकारिणीची बैठक झाली होती. आता आमच्यासमोर पोटनिवडणुका आहेत, त्यासाठी रणनीती तयार करायची आहे आणि नवनिर्वाचित शिक्षक व पदवीधर आमदारांचाही सत्कार करायचा आहे. नेते राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत चाललेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही सत्कार करायचा आहे. हे आयोजन करण्यासाठी आम्ही कार्यकारिणीची बैठक येत्या १५ फेब्रुवारीला ठेवलेली आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:11 IST