अकोला : उन्हाळ्याच्या सुट्ट्यांदरम्यान प्रवाशांची वाढलेली गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त प्रवासी भार कमी करण्यासाठी हजूर साहिब नांदेड-आसनसोल दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वेगाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०७७०१ हजूर साहिब नांदेड-आसनसोल विशेष ही गाडी मंगळवारी हजूर साहिब नांदेड येथून रात्री २३.५० येथून सुटेल व आसनसोल येथे गुरुवारी १२ वाजता पोहोचेल.

‘या’ स्थानकावर थांबा

ही गाडी पूर्णा (०२.२० वाजता), हिंगोली (०३.५२ ), वाशीम (०४.५२), अकोला (६.५०), बडनेरा (८.३२), नागपूर (१२.१०), गोंदिया (१४.१५), दुर्ग (१६.३५), रायपूर (१७.३०), बिलासपूर (१९.४५), झारसुगुडा (२३.३५), राऊरकेला (०१.५५), टाटानगर (७.२०), चांदिल (८.३२) आणि पुरुलिया (९.४२) स्थानकावर थांबणार आहे. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७७०२ आसनसोल-हजूर साहिब नांदेड विशेष ही गाडी २३ एप्रिल गुरुवार रोजी आसनसोल (१४.०० वाजता) येथून सुटेल व हजूर साहिब नांदेड (००.४५) येथे शनिवारी पोहोचेल. या गाडीमध्ये एकूण २४ डबे असतील. त्यामध्ये दोन एसी टू टियर, सहा एसी थ्री टियर, १० स्लीपर क्लास, चार जनरल सेकंड क्लास आणि दोन एसएलआर डबे असतील.

दक्षिण मध्य रेल्वेची विशेष गाडी अकोला मार्गे धावणार

उन्हाळ्याच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन ते हिसार दरम्यान नांदेड, अकोला मार्गे विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे प्रवाशांना अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध होऊन गर्दीच्या काळात लाभ मिळेल. गाडी क्रमांक ०७७१७ काकीनाडा टाउन-हिसार विशेष गाडी मंगळवारी रोजी काकीनाडा टाउन स्थानकावरून सकाळी ५.४० वाजता सुटेल. ही गाडी अकोला (५.४५ वाजता) येथे पोहोचेल. पुढे भुसावळ, वडोदरा, रतलाम आणि चित्तौडगड या प्रमुख स्थानकांमार्गे गुरुवारी १३.४० वाजता हिसार येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७७१८ हिसार-काकीनाडा टाउन विशेष गाडी शुक्रवारी हिसार येथून १४.१० वाजता सुटेल आणि रविवारी १२.३५ वाजता काकीनाडा टाउन येथे पोहोचेल.

३५०० कि.मी.चे अंतर आणि ९६ तासांचा प्रवास

३५०० कि.मी.चे अंतर सुमारे ९६ तासांत ही गाडी पार करणार आहे. या विशेष गाडीमुळे नियमित गाड्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. तसेच प्रवाशांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळेल. विशेष गाड्यांच्या माध्यमातून गर्दीच्या काळात प्रवाशांना मोठा लाभ होणार आहे.