scorecardresearch

Premium

गडचिरोली : अबब… ‘या’ लाकडी बैलजोडीची किंमत वाचून तुम्हालाही फुटेल घाम, जिल्हाभरात चर्चेचा विषय

बैल पोळ्यानिमित्त सर्वत्र उत्साह असून शहरातील बाजारपेठ विविध आकाराच्या लाकडी नंदीबैलांनी फुलली आहे. यात ७० हजारांची बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Nandi price Gadchiroli
गडचिरोली : अबब… ‘या’ लाकडी बैलजोडीची किंमत वाचून तुम्हालाही फुटेल घाम, जिल्हाभरात चर्चेचा विषय (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

गडचिरोली : बैल पोळ्यानिमित्त सर्वत्र उत्साह असून शहरातील बाजारपेठ विविध आकाराच्या लाकडी नंदीबैलांनी फुलली आहे. यात ७० हजारांची बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत असून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे. यातील एक बैल ४० तर दुसरा ३० हजारांचा आहे.

हेही वाचा – बैल पोळ्यावर महागाईची ‘झूल’; ‘सर्जा-राजा’चा साजश्रुंगार महागला; जाणून घ्या बाजारातील स्थिती

Devotees demand through a march in Kolhapur
बाळूमामा देवस्थानातील गैरव्यवहाराची सीआयडीकरवी करा; कोल्हापुरात मोर्चाद्वारे भक्तांची मागणी
tourist vehicles blocked the path of the tiger in the Tadoba-Andhari tiger project buffer zone
Video : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या बफर क्षेत्रात पर्यटक वाहनांनी अडवली वाघाची वाट
akola soybean farmers marathi news, soybean farmers in trouble akola marathi news, akola soybean marathi news
सोयाबीनची उत्पादकता अधिक, नाफेडकडून खरेदी मात्र मर्यादित; शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
inspection of four vehicles Dhule district
एकापाठोपाठ चार वाहनांच्या धुळे जिल्ह्यात तपासणीचे कारण काय?

हेही वाचा – चंद्रपूर : शेतात मृतावस्थेत आढळली वाघीण; आठ दिवसांत ३ बछडे आणि वाघिणीच्या मृत्यूने वनखात्यात खळबळ

वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी पोळा हा सण साजरा केला जातो. प्रामुख्याने विदर्भात दुसऱ्या दिवशी बालगोपाळ लाकडी नंदीबैल फिरवून तान्हापोळा साजरा करतात. याकरिता शहरात विविध आकार व रंगाचे लाकडी नंदीबैल विक्रीकरीता आले आहे. आकर्षक नक्षीकाम केलेली बैलजोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. यातील ४० व ३० हजाराचे नंदीबैल चर्चेचा विषय ठरले आहे. गोकुळनगरमधील राहुल कोसरे यांनी हे नंदीबैल साकारले आहे. परंतु यांची किमंत ऐकूणच अनेकांना तोंडात बोट घालण्याची वेळ येत आहे. तरीही या सुरेख कलाकृतीला बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Nandi price is a topic of discussion on the occasion of pola festival in gadchiroli district ssp 89 ssb

First published on: 12-09-2023 at 13:58 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×