बुलढाणा : हनुमंत, हनुमान, पवनपुत्र , मारुतनंदन अशा विविध नावाने संबोधित करण्यात येणाऱ्या हनुमानाच्या जयंतीचा जल्लोष आज महाराष्ट्र सह संपूर्ण देशात थाटात साजरा करण्यात येत आहे. सह्याद्रीचा कणखर देशा म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या खेडोपाड्यात हनुमानाची मंदिर वा मूर्ती आहे. आबालावृद्ध भाविकांचे लाडके दैवत असणाऱ्या हनुमानाची जयंती पारंपरिक उत्साहात सर्वत्र साजरी करण्यात आली.
मात्र या सर्व जयंती उत्सवात सर्वाधिक थाट असतो तो बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील महाउत्सवाचा. याचे कारण देखील तसेच महा आहे.

नांदुऱ्यातील हनुमंतांची मूर्ती तीस चाळीस नव्हे तर हनुमानाप्रमाणेच महाकाय म्हणजे तब्बल १०५ फूट उंच आहे. या गगन चुंबी मूर्तिची नोंद ही लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये झाली आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारी ही मूर्ती देशातील देखील सर्वात उंच मूर्ती मानली जाते. त्यामुळे कोलकाता ते मुंबई या राष्ट्रीय महामार्ग वर आणि मध्य रेल्वेला जोडलेल्या नांदुरा या तालुका स्थळी या महाकाय राम भक्ताचे दर्शन करण्यासाठी वर्षभर भाविकांची गर्दी राहते. गजानन महाराजच्या शेगावला अगदी लागून हे गाव आहे. हनुमान जयंतीला तर तिथे हजारो भाविकांची मांदियाळी जमते.

शाही जयंती

अगदी अनेक किलोमीटर अंतरावरून दिसणाऱ्या या मूर्तीला आधुनिक तंत्रज्ञानाचा अर्थात रिमोटचा वापर करून माल्यार्पण करण्यात येते. आज १०५ फूट मूर्तीला साजेसा म्हणजे तब्बल दीड क्विंटल फुलांचा हार अर्पण करण्यात आला. आज गुरुवारी सकाळी विधिवत पूजन करून रिमोटच्या मदतीनेच मारोती रायाला जलाभिषेक करण्यात आला. मंत्र उच्चार,पंचामृत, गंगाजल, स्तुती स्तवन असा या अभिषेकचा थाट होता.

भूकंपरोधक क्षमता

बुलढाणा जिल्ह्याच्या नांदुरा येथील लिम्का बुक रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या १०५ फुटाच्या देशातील सगळ्यात उंच हनुमान मूर्तीच्या साक्षीने आज हनुमान जयंती उत्साहात साजरी झाली. या हनुमान मूर्तीची ताशी ३५० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे आणि ४.५ रेक्टर स्केल चा भूकंप सहन करण्याची क्षमता आहे. अशा अद्भुत आणि विशालकाय हनुमान मूर्तीच्या साक्षीने याची देही याची डोळा असा रुबाबदार हनुमान जयंतीचा उत्सव साजरा झाला. या मूर्तीचे दर्शनासाठी राज्यातून भाविक भक्त इथे आज जमा झाले. शेजारील बालाजी मंदिरात दर्शन घेऊन भाविक उत्सव साजरा करत असतात. आज सकाळ पासून येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

दीड क्विंटल फुलांचा हार

२३ वर्षांपूर्वीच लिमका मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा शहरात २००० साली या १०५ फूट उंच हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात आली. तेवीस वर्षांपूर्वी म्हणजे सन २००३ मध्ये लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या उंच हनुमान मूर्तीची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २७ वर्षांपासून ह्या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त विविध कार्यक्रम राबवले जातात. हनुमान जयंतीला उंच मूर्तीवर तब्बल दीड क्विंटल फुलांचा हार वजनाचा फुलांचा हार चढवण्यात येतो. रिमोटनेच पंचामृत जलाभिषेक करण्यात येतो.