scorecardresearch

Premium

गोंडवाना विद्यापीठाला राष्ट्रीय पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते गडचिरोलीचा सन्मान

एकाच वेळी रासेयोचे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पहिले विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाला मान मिळाला.

National Award to Gondwana University
गोंडवाना विद्यापीठाला राष्ट्रीय पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते गडचिरोलीचा सन्मान (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित चामोर्शी येथील केवलरामजी हरडे महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक डॉ. पवन नाईक व स्वयंसेविका जानव्ही पेद्दीवार यांना सन २०२१-२२ चा राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा राष्ट्रीय पुरस्कार २६ सप्टेंबरला जाहीर झाला होता. दरम्यान २९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथील दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हेही वाचा – बालाघाट जिल्ह्यात हॉकफोर्ससोबतच्या चकमकीत एक नक्षलवादी ठार; १४ लाखांचे होते बक्षीस

Yashwantrao Chavan Maharashtra Open University
मुक्त विद्यापीठाला चार महिन्यात १६२ कोटीचा विक्रमी महसूल; अनेक नव्या अभ्यासक्रमांना मान्यता
Best Pits Engineer Award
चंद्रपूर : कार्यकारी अभियंत्याला उत्कृष्ट खड्डे सम्राट अभियंता पुरस्कार, मनसेचे अनोखे आंदोलन
maharashtra andhashraddha nirmoolan samiti award
सातारा:महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा हेरंब कुलकर्णी व प्रभाकर नानावटी यांना पुरस्कार
Vidarbha level singing competition wardha
वर्धा : स्वरवैदर्भी ! मयूर पटाईत अव्वल, मेघे अभिमत विद्यापीठाची विदर्भस्तरिय गीतगायन स्पर्धा

हेही वाचा – नागपूर : फुटाळा तलावालाही धोका, ३५० कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, भारत सरकारद्वारा राष्ट्रीय सेवा योजनेतील उत्कृष्ट कार्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. एकाच वेळी रासेयोचे दोन राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे पहिले विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाला मान मिळाला. यशाबद्दल कुलगुरूंसह कुलसचिव व विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: National award to gondwana university gadchiroli honored by the president ssp 89 ssb

First published on: 30-09-2023 at 13:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×