चंद्रपूर : महाराष्ट्र सरकारने राज्यातील 18 ओबीसी जातींना केंद्रीय सूचिमध्ये समावेश करण्यास केलेल्या शिफारसींवर शुक्रवारी, २६ जुलै रोजी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने जनसुनावणी घेत अहवालातील त्रुटींची पुर्तता झाल्यानंतर या सर्व जातींना केंद्रीय सुचीमध्ये समाविष्ट केले जाईल अशी ग्वाही जनसुनावणीस उपस्थित समाजबांधवांना दिली. मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या केंद्रीय ओबीसी आयोगाच्या या जनसुनावणीला विभागाचे प्रधान सचिव, सचिव, राज्य मागासवर्गीय आयोगाचे सचिव, केंद्रीय आयोगाचे सदस्य कमल भुषण, सचिव, सल्लागार व राज्याचे वरीष्ठ अधिकारी यांचेसह १६ जातींचे प्रतिनिधी उपस्थित होते. हेही वाचा : ६ महिन्यांत १६६ अपघातबळी; अमरावती जिल्ह्यात रस्ते अपघातांचे… या जनसुनावणीमध्ये आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी उपस्थित सचिव व संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल व प्रस्तावातील त्रुटींची पुर्तता करून उर्वरीत माहिती आयोगास लवकरच सादर करावी असे निर्देश दिले. या जनसुनावणीला उपस्थित असलेल्या विविध जातींच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करून निर्देशानुसार आवश्यक त्रुटींची पुर्तता केल्यानंतर व विषयानुशंगाने काटेकोर माहिती असलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतर घटनात्मक बाबी तपासुन या सर्व १८ जातींचा समावेश केंद्रीय सूचिमध्ये करण्याची तातडीने कार्यवाही केली जाईल. असे आश्वासन हंसराज अहीर यांनी यावेळी दिले. या १८ जातींचा समावेश शक्य महाराष्ट्रातील लोध, लोधा, लोधी, बडगुजर, वीरशैव लिंगायत, सलमानी, सैन, किराड, भोयर पवार, सुर्यवंशी गुजर, बेलदार, झाडे, झाडे कुणबी, डांगरी, कलवार, निषाद मल्ला, कुलवंतवाणी, कराडी, शेंगर, नेवेवाणी, कानोडी, कानडी या जाती समूहाचा राष्ट्रीय मागासवर्ग यादीत समावेश करण्याबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे निवेदने प्राप्त झालेली आहेत. या जातींचा ओबीसी मध्ये समावेश करण्याबाबत नुकतीच मुंबई येथे बैठक पार पडली आहे. विशेष म्हणजे, ही बैठक अतिशय सकारात्मक पद्धतीने पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले. हेही वाचा :चंद्रपूर : ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवार विरुद्ध अतुल देशकर सामना! सुधीर मुनगंटीवार यांनी दिले संकेत जातनिहाय जनगणेसाठी खा. धानोरकरांनी घेतली राष्ट्रपतींची भेट महाराष्ट्रात मराठा समाज मनोज जरांगे याचे नेतृत्वात आरक्षणाच्या मागणीसाठी आदोंलन करित असताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शुक्रवारी राष्ट्रपती भवनात मा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची भेट घेत जातीनिहाय जनगणेची मागणी केली. विविध जातीचा आरक्षणासाठी लढा सुरु असुन अनेक आदोंलने महाराष्ट्रात सुरु आहेत. मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचे आरक्षणासाठी आदोंलन सुरु आहे. या आदोंलनाचा तिढा अद्यापही राज्य शासन सोडवु शकले नाही. अनेक आदोंलनकर्त्यानी आरक्षणासाठी प्राण देखिल गमावले. मागिल १४ वर्षापासून अदयापही केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना केली नाही. यामुळे सरकारकडे कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. या पार्शभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राष्ट्रपती र्द्रोपदी मुर्मु यांची भेट घेत, महाराष्ट्रातील तिढा सोडविण्याची मागणी या वेळी केली.राज्यातील आरक्षणाचा तिढा सोडविण्यासाठी राज्य सरकार कढुन केंद्र सरकारने अहवाल मागवुन जातनिहाय जनगणना करुन ५० टक्के अरक्षणाची मर्यादा वाढवावी अषी मागणी देखिल यावेळी करण्यात आली. या संदर्भात राष्ट्रपती यांनी सकारात्मक चर्चा होवुन भविष्यात या मध्ये सरकारला मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्याच्या सुचना करणार असल्याचे सांगितले. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या सोबत खासदार वंसतराव चव्हाण, खासदार नागेश पाटील, खासदार संजय जाधव याची देखिल उपस्थिती होती.