नागपूर : पेंच ते खवासा हा राष्ट्रीय महामार्ग ४४ वन्यप्राण्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या महामार्गावर महाराष्ट्राच्या बाजूने भरधाव वाहनाच्या धडकेत एका बिबटय़ाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता पुन्हा मध्यप्रदेशातील खवासा सीमेजवळ वाहनाच्या धडकेत मादी बिबट मृत्युमुखी पडला आहे. हा परिसर ‘ग्रीन कॉरिडॉर’ म्हणून ओळखला जात असून वन्यजीवांच्या सुरक्षित हालचालीसाठी तो बांधण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही या महामार्गावर मृत्यू होत असल्याने त्यावर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रातील तसेच मध्यप्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगतचा हा राष्ट्रीय महामार्ग ४४ आहे. या महामार्गाच्या दोन्ही कडेला घनदाट जंगल असल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांखाली वन्यप्राण्यांचे मृत्यू थांबवण्यासाठी उपशमन योजना करण्यात आल्या. या उपशमन योजनांवर सुमारे ६०० ते ७०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्यानंतरही वन्यप्राण्यांचे अपघाती मृत्यू सुरूच आहेत. जुन्याच पुलांना नवीन दाखवणे, नवीन बांधण्यात आलेल्या पुलाखाली कायम पाणी साचून राहणे या प्रकारांमुळे उपशमन योजनांच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागपूर ते सिवनी महामार्गावर मनसरपासून रस्त्याच्या दोन्ही कडेला जंगल आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National highway 44 death wildlife leopard death vehicle ysh
First published on: 30-09-2022 at 00:02 IST