गडचिरोली : नक्षल्यांच्या हिंसाचारामुळे अतिसंवेदनशील गटात मोडणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात पोलीस अधीक्षकपदाचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक होणे अपेक्षित असताना मुंबईचे पोलीस उपआयुक्त निलोत्पल यांची पोलीस अधीक्षकपदी करण्यात आलेली निवड शासनाच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे, शेवटच्या क्षणाला निलोत्पल यांची निवड करण्यात आल्याची चर्चा पोलीस विभागात आहे.

हेही वाचा : विश्लेषण: पुण्यात अचानक इतका पाऊस का पडला? तब्बल ३३९ टक्के अतिरिक्त पाऊस पडण्यामागे कारण काय?

शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
sunil tatkare and ajit pawar devendra fadnavis morning oath
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आम्ही दोन्ही…”
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण

नक्षल्यांच्या दहशतीमुळे गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभागाला अनेक मोर्चांवर कामे करावी लागतात. त्यामुळे याठिकाणी जिल्हा अधीक्षकपदाचा अनुभव असलेली व्यक्ती हवी, अशा प्रकारचा प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन होता. तेव्हापासून गडचिरोली पोलीस अधीक्षकपदी अनुभवी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येत होती.

हेही वाचा : नागपूर: अजित पारसेला अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ, वारंवार आत्महत्या करण्याचे नाटक

मात्र, ऐनवेळेस मुंबईचे पोलीस उपआयुक्त निलोत्पल यांची गडचिरोली येथे बदली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गडचिरोलीचे नवे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांना यापूर्वी जिल्हा सांभाळण्याचा अनुभव नाही. त्यामुळे शासनाच्या धोरणावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.