गडचिरोली : जहाल नक्षली शंकर राव उर्फ वाचम शिवा याची हत्या केल्याच्या ठपका ठेऊन नक्षल्यांनी सहकारी नक्षल्याची गोळ्या झाडून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना एटापल्ली तालुक्यातील गर्देवाडा गावानजीक घडली. दिलीप उर्फ नितेश गजू हिचामी (२६) असे मृत नक्षलीचे नाव असून, तो एटापल्ली तालुक्यातील झुरी या गावचा रहिवासी होता.

हेही वाचा >>> जळगाव : ग्रामपंचायत निवडणूक वादातून युवकांची हत्या करणाऱ्या दाम्पत्यास जन्मठेप

farmer near chakan planted 66 cannabis plants in corn field
पिंपरी : चाकणमध्ये मक्याच्या शेतात गांजा
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी मध्यरात्रीनंतर नक्षल्यांनी दिलीप हिचामी यास गर्देवाडा गावाजवळच्या रस्त्यावर गोळी झाडून ठार केले. मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. दिलीप हिचामी हा २०११ मध्ये एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरून नक्षल दलममध्ये सहभागी झाला होता. २०१२ मध्ये तो कसनसूर एलओएसचा पूर्णवेळ सदस्य म्हणून काम पाहत होता. सप्टेंबर २०२२ पर्यंत तो दलममध्ये विविध जबाबदाऱ्या पार पाडत होता. परंतु ऑक्टोबर महिन्यात दिलीपने पोलिसांच्या सांगण्यावरून नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य शंकर राव उर्फ वाचम शिवा याची हत्या केली. ही हत्या चकमकीत झाल्याचा देखावा दिलीपने केला. परंतु तोच पोलिसांचा खबऱ्या होता. त्यामुळे त्याची हत्या करीत असल्याचे नक्षल्यांनी दिलीपच्या मृतदेहावर टाकलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

कोण होता शंकर राव उर्फ वाचम शिवा ?

ज्या नक्षल्याची हत्या केल्याचा आरोप ठेऊन दिलीप हीचामी या नक्षल्याची हत्या करण्यात आली, तो नक्षल्यांच्या विभागीय समितीचा सदस्य होता. ४० वर्षे विविध दलममध्ये सक्रिय राहून त्याने हिंसक कारवाया केल्या. त्याने नक्षल्यांच्या दंडकारण्य झोनमध्ये अधिक वेळ घालविला. नक्षल्यामध्ये त्याला डॉक्टर म्हणून ओळखल्या जायचे. त्याची दिलीपने २८ ऑक्टोबरला हत्या केली व पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाल्याचा बनाव केला, असा आरोप नक्षल्यांनी पत्रात केला आहे. सोबतच एक पत्रक काढून २२ नोव्हेंबरला शंकर रावच्या स्मृतीत शोक दिवस पाळण्याचे आव्हानदेखील केले आहे.