scorecardresearch

Premium

अमरावती : ‘इंडिक टेल्स’विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्‍यांची प्रचंड घोषणाबाजी

सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स वेबसाईट विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आंदोलन करण्‍यात आले.

NCP agitation against Indic Tales
अमरावती : 'इंडिक टेल्स'विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्‍यांची प्रचंड घोषणाबाजी (छायाचित्र – लोकसत्ता टीम)

अमरावती : सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स वेबसाईट विरोधात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या वतीने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात आंदोलन करण्‍यात आले. कार्यकर्त्‍यांनी यावेळी निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे शहराध्‍यक्ष प्रशांत डवरे यांच्‍या नेतृत्‍वात हे आंदोलन करण्‍यात आले. सावित्रीबाईंची बदनामी करण्याचा हा प्रकार अतिशय निंदनीय असून अशा अपप्रवृत्तीचा वेळीच बिमोड करणे गरजेचे आहे. असे अपप्रकार अजिबात खपवून घेतल्या जाणार नाही, असा इशारा प्रशांत डवरे यांनी दिला.

Sharad Pawars meeting in gondia
प्रफुल्ल पटेलांच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची तोफ धडाडणार; गोंदियात लवकरच सभा, सभेनंतरच कळणार…
congress not get proposal from Prakash Ambedkar says mp kumar ketkar
“ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला प्रस्तावच नाही,” खासदार कुमार केतकर यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…
ajit-pawar-sharad-pawar-poster-in-pune
शरद पवार आणि अजित पवार यांच्यात ‘मनोमिलनाची आस’, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची पुण्यात पोस्टरबाजी
Anil Deshmukh Samudrapur
…अन् माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच भारावले! नेमकं काय घडलं? वाचा…

हेही वाचा – अरे व्वा.. मोकाट श्वानांच्या १८ पिल्लांना मिळाले हक्काचे घर; पशुप्रेमींचा मुक्या जनावरांना मायेचा ओलावा

या पोर्टलवर इतिहासाची पुनर्मांडणी या नावाखाली अक्षरशः इतिहासाची मोडतोड सुरू आहे. महापुरुषांच्या इतिहासाची मोडतोड करून अपमानजनक लिखाण करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीला वेळीच ठेचण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुले यांची बदनामी व अनादर याबाबत शासनाने गांभीर्याने दखल घेऊन आक्षेपार्ह लेख लिहिणाऱ्या इंडिक टेल्स या वेबसाईटवर तात्काळ बंदी आणावी आणि अवमानकारक लेख लिहिणारी वेबसाईट तसेच लेखकावर अतिशय कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या वतीने करण्यात आली.

हेही वाचा – “आमच्यावर सरकारचा राग का?”; संतप्त ओबीसींचा नागपूरच्या संविधान चौकात ठिय्या

आंदोलनात अविनाश मार्डीकर, अशोक हजारे, डॉ. गणेश खारकर, ऋतुराज राऊत, आनंद मिश्रा, दिलीप शिरभाते, राजेंद्र टाके, आकाश वडनेरकर, शैलेश अमृते, सचिन खंडारे, शिवपाल ठाकूर, सचिन दळवी, बंडू निंभोरकर, चेतन वाठोडकर, किशोर चव्हाण, भूषण बनसोड, अनंत तेलखडे, संदीप आवारे आदी सहभागी झाले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp agitation against indic tales mma 73 ssb

First published on: 01-06-2023 at 16:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×