भाजपाशीसीत नागपूर महापालिकेने अंबाझरी उद्यानाची ४३ एकर जागा हडपली आणि खासगी लोकांच्या घशात घातली. भाजपशासित महापालिकेने यात मोठा घोटाळा केला, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला. विधानभवन परिसरात ते पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा- nagpur Gram Panchayat Election Result 2022: उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या दत्तक गावात काँग्रेसचा झेंडा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सत्ताधारी घाबरले आहेत. यामुळेच त्यांना विधानभवानाच्या पायऱ्यावर आंदोलन करावे लागत आहे. सहा महिन्यांत या सरकारने विकासाचे एकही काम केले नाही. केवळ भूखंड हडपण्याचे काम ते करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृत भवन पाडून त्या ठिकाणी अ‍ॅम्युझमेंट पार्क तयार करीत आहेत. आंबेडकरी जनतेचा भाजपने अपमान केला आहे. संत आणि महापुरुषांचा अपमान करणारे हे सरकार भ्रष्टाचारी असून जनताच त्यांना धडा शिकवेल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.