राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची सूचना

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकत्र्यांना संबोधताना नागपूर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी करण्याची सूचना केली. ते आज सोमवारी जैन कलार समाज भवनात कार्यकत्र्यांची संवाद साधत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, महिला आघाडी प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर, युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष रवि वरपे, युवती आघाडीच्या प्र्रदेश अध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, कार्यक्रम संयोजक प्रवीण कुंटे पाटील, राकाँपाचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीणचे अध्यक्ष बाबा गुजर, महिला आघाडीच्या शहर अध्यक्ष लक्ष्मी सावरकर, ग्रामीणच्या अध्यक्ष अर्चना हरडे उपस्थित होत्या. आज शहरातील तीन व ग्रामीणमधील तीन विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकत्र्यांकडून सूचना मागवल्या. आज सकाळी पाटील यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. तसेच माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्या उपोषण मंडपाला भेट देऊन त्यांचे उपोषण सोडवले. पाटील म्हणाले, राजकारणात शक्तीला महत्त्व असते. शक्तीशिवाय कोणी दखल घेत नाही. प्रत्येक बुथवर, वार्डात ताकद वाढवली जाऊ शकते. त्यासाठी कार्यकत्र्यांनी तयारी केली पाहिजे. तयारी अशी करा की, उमेदवारी मागण्याची आवश्यकता पडायला नको, असेही ते म्हणाले.

महाराष्ट्र विरोधी अर्थसंकल्प

ज्या राज्यात पुढील वर्षी निवडणुका आहेत, त्या राज्यांसाठी जास्त निधीची तरतूद करण्याचा अनिष्ट पायंडा मोदी सरकारने पाडला आहे. महाराष्ट्रासाठी  अनुदानाची तरतूद नाही. हे अर्थसंकल्प महाराष्ट्रविरोधी आहे, अशी टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.  केंद्र सरकारने आपले सर्वच विकायला काढले आहे. यावर्षी टॅबवर बजेट मांडले गेले आहे. पुढील वर्षी ओएलक्सवर ते मांडण्यास सरकार कमी करणार नाही.  विकास दर उणे असताना आणि गरिबांचे जीणे कठीण झाले असून हा अर्थसंकल्प निराश करणारा आहे. सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. विशिष्ट उद्योगपतींसाठीचा अर्थसंकल्प आहे. १ लाख ४५ हजार कोटी कॉर्पोरेट सेक्टरला मदत देण्यात आली. कराच्या पद्धती कोणताही बदल नाही. शेतकरी आंदोलन बघून शेती उत्पादन खर्चावर दीड पट भाव देण्याची घोषणा केली. पण, अशा घोषणा वास्तवात कधी येत नाही.