नागपूर : नीट पेपर फुटीचे प्रकरण समोर आल्यानंतर राज्यात अन्न औषध निरीक्षक चाळणी परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार समोर आला. या प्रकणी गुन्हेही दाखल करण्यात आली असून सहा आरोपींना अटक करण्यात आली. तर महागाईही वाढत आहे. दैनंदिन गरजांच्या वस्तूंचे दर वाढत आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळ्यात येत असल्याने नागरिका त्रस्त आहेत. लोकांच्या हाताला रोजगार नसल्याच्या मुद्द्यांवर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हाधिकारी कार्यालावर मोर्चा धडकला.
मोर्चात मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अनेक कार्यकर्ते दुचाकींवर स्वार झाले होते. त्यांच्या हातात तिरंगा होता. सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. राज्यात शासकीय भरती परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा पेपर फुटल्याचे प्रकरणही समोर आले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने केला. याशिवाय वाढती महागाई, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती आणि रोजगाराच्या अभावामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आर्थिक ताण वाढत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या मुद्द्यावरूनही नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला. बेरोजगारीमुळे युवकांमध्ये वाढत असलेली अस्वस्थता, परीक्षांमधील पेपरफुटी आणि महागाई या प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मुद्द्यांवरून आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही पक्षाच्या वतीने देण्यात आला.
