scorecardresearch

“निवडणूक आयोगाचा पेपर फुटला”, सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, “मला भीती वाटतेय, काही तरी गोलमाल…”

पक्ष आणि चिन्‍ह आम्‍हालाच मिळेल, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्‍यावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहे.

ajit pawar supriya sule party symbol
अजित पवार, सुप्रिया सुळे

अमरावती : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये चिन्ह आणि पक्ष कुणाचा याबाबत ६ ऑक्टोबरला निवडणूक आयोगात सुनावणी पार पाडणार आहे. पक्ष आणि चिन्‍ह आम्‍हालाच मिळेल, असा दावा अजित पवार गटाकडून केला जात असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्‍यावर प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित केले आहे.

येथे पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, मला थोडी भीती वाटायला लागली आहे. मला वाटते निवडणूक आयोगाचा पेपर फुटला आहे. नाहीतर काहीतरी गोलमाल आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर गेलेल्‍या घटकाचे वरिष्‍ठ नेते तारखेवार आम्‍हाला या दिवशी पक्ष मिळेल, या तारखेला पक्षाचे चिन्‍ह मिळेल, असा दावा करताहेत. यांना निवडणूक आयोगाचा निकाल कसा कळला, अजून तर आयोगाकडे सुनावणी देखील सुरू झालेली नाही. परीक्षेला बसण्‍याआधीच त्‍यांना आपले गुण माहिती झाले आहेत, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

priyanka gandhi yashomati thakur
“प्रियंका गांधी महाराष्‍ट्रातून निवडणूक लढल्‍यास आनंदच”, यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, “अमरावती मतदार संघ जर…”
Jayant patil on election commission
“पक्षात फूट नसल्याचं सांगूनही सुनावणी लावली”, जयंत पाटलांचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
Nana Patole on Shinde mla
“शिंदे गटाचे ४० आमदार अपात्र ठरणार”, नाना पटोलेंची भविष्यवाणी, ‘शेड्यूल १०’चा दिला संदर्भ
Jayant Pati
“राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, पण…”, जयंत पाटलांची टीका

हेही वाचा >>> “प्रियंका गांधी महाराष्‍ट्रातून निवडणूक लढल्‍यास आनंदच”, यशोमती ठाकूर म्‍हणाल्‍या, “अमरावती मतदार संघ जर…”

सुप्रिया सुळे म्‍हणाल्‍या, वेगळ्या झालेल्‍या घटकाकडे दिल्‍लीतील कुणीतरी माहीतगार असावा, जो यांना तारखेसहीत सर्व माहिती पुरवीत आहे. परीक्षा देण्‍याआधीच त्‍यांना आपल्‍याला पक्ष आणि चिन्‍ह मिळेल, असा दावा ते कसा काय करू शकतात. निवडणूक आयोगाकडील सुनावणी पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणाने व्‍हायला हवी, अशी आमची अपेक्षा आहे. त्‍यांना जर निकाल ठाऊक असेल, तर निश्चितपणे काहीतरी गोलमाल सुरू आहे, असे त्‍या म्‍हणाल्‍या.

हेही वाचा >>> “हे तर खुनी सरकार…” नांदेडच्‍या रुग्णालयातील मृत्‍यूसत्रावरून सुप्रिया सुळे यांची टीका; म्हणाल्या, “लोकांच्या मनात…”

शरद पवार हे भाजप सरकारला येत्‍या पंधरा  दिवसात पाठिंबा देणार, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. याविषयी विचारले असता, सुप्रिया सुळे यांनी अजून अकरा दिवस राहिले आहेत, वाट बघू, असा टोला लगावला. आपल्‍याकडे अशा गोष्‍टींसाठी वेळ नाही. शेतकरी, सर्वसामान्‍यांचे अनेक प्रश्‍न समोर आहेत. सोयाबीन उध्‍वस्‍त झाले आहे. कापसासह इतर पिकांचे उत्‍पादन कमी होण्‍याची शक्‍यता आहे. दुष्‍काळी परिस्थितीत लोकांना मदत करण्‍याची आवश्‍यकता आहे. आपले लक्ष त्‍याकडे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ncp symbols and parties decision on october 6 in the election commission supriya sule mma 73 ysh

First published on: 03-10-2023 at 13:50 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×